History, asked by jadhavbipin509, 1 year ago

धरणे बांधणे मागील उद्दिष्टे​

Answers

Answered by kapilchaudhary2
3

Answer:

\bold{Hiii . frd }

 <b>

{\mathbb{CORRECT}}

\huge\boxed{\texttt{\fcolorbox{aqua}{grey}{Answer}}}

⭐⭐⭐⭐⭐⭐⭐⭐⭐⭐⭐

✔अभ्यास

धरणबांधणीत मजबूत पायाचे महत्त्व अनन्यसाधारण असते. साठवलेल्या पाण्याचा, स्वतःच्या वजनाचा, झिरपणाऱ्या पाण्याचा भार, ह्या सारख्या अनेक भार प्रणालींमुळे निर्माण झालेली प्रतिबले धरणाच्या पायावर सोपवली जातात. भूगर्भातून बाहेर पडणाऱ्या भूकंप लहरी सर्व प्रथम धरणाच्या पायाजवळ आघात करतात. ह्यासाठी धरणाच्या नियोजित जागेसभोवतालच्या प्रदेशात होऊन गेलेल्या भूकंपाची माहिती असावी लागते. त्या जागेत जोड आणि भूस्तरभंग आहेत का आणि असतील तर त्यांची आजची स्थिती, पुन्हा भूकंप होण्याची शक्यता आणि त्याची क्षमता अजमावणे गरजेचे असते. शिवाय पायाचा खडक पारगम्य (permeable) नसेल तर पाणी झिरपून न जाता जास्तीत जास्त पाणी साठवता येते. त्यामुळे उत्तम अभेद्य खडक पायासाठी योग्य मानला जातो.  म्हणून धरणाच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने भूगर्भातल्या खडकांचा प्रकार, पायाकरता योग्य खडकापर्यंत पोहोचण्यासाठी वरच्या थरांची खोली, खडकांची घनता, त्यातील पाण्याचे प्रमाण, वजन पेलण्याची क्षमता किंवा ताकद (strength) असे खडकांचे  अभियांत्रिकी गुणधर्म माहिती असणे अत्यंत गरजेचे असते. याकरता धरणाची जागा ठरवताना भूगर्भ  तत्ज्ञांची मदत घेतली जाते. भूगर्भ तत्ज्ञ पायाच्या खडकांबद्दलची  माहिती भूवैज्ञानिक आणि भूभौतिकी सर्वेक्षणाच्या साह्याने मिळवतात.खडकांची सर्वांगीण माहिती कळण्यासाठी धरणाच्या जागेवर ठिकठिकाणी खोल छिद्रणे घेऊन जमिनीच्या विविध स्तरातील खडकांच्या नमुन्यांची प्रयोगशाळेत चाचणी करतात आणि ताकद, पारगम्यता सारखे खडकांचे अभियांत्रिकी गुण याबद्दल माहिती मिळवली जाते. ही  प्राथमिक पध्दतीने मिळवलेली माहिती सखोल भूभौतिकी पध्दती वापरून तपासली जाते. ‘इलेक्ट्रिकल साउंडिंग’, ही भूभौतिकी पध्दत वापरून resistivity (प्रतिरोध) मोजली जाते. अग्निजन्य खडकांची resistivity सगळ्यात जास्त ,गाळाच्या खडकांची सगळ्यात कमी तर रुपांतरीतची मध्यम असते. जितका खडक अभेद्य तितकी resistivity जास्त. खडकांमधल्या पाण्याच्या प्रमाणावर पण resistivity अवलंबून असते. खडकात जितके जास्त पाणी तितकी resistivity कमी. ह्या कारणासाठी पारगम्य खडकांची resistivity कमी असते.    भूकंपीय लहरींच्या अपवर्तनाचा (refraction) अभ्यास करून धरणाच्या नियोजित जागेतील वेगवेगळ्या थरातील खडकांची प्रत आणि खोलीबद्दलची संपूर्ण माहिती मिळवली जाते. ह्यालाच भूकंपीय अपवर्तन पध्दती(seismic refraction method) म्हणतात.

जेंव्हा लहरी एका माध्यमातून दुसऱ्या माध्यमात जातात तेंव्हा काही प्रमाणात परावर्तन(reflection) तसेच अपवर्तन (refraction) होते. या पध्दतीत खालील  आकृती मध्ये दाखवल्याप्रमाणे प्रक्षेपक(Energy source) आणि ठराविक व सारख्या अंतरावर शोधक (detectors-Geophones) वापरले जातात. प्रक्षेपकाच्या जागी हातोडा किंवा उंचीवरून वजन सोडून भूकंपीय लहरी निर्माण केल्या जातात. ह्या लहरी विविध थरामधून प्रवास करतात. एका विशिष्ट कोनातल्या आपाती (incident) लहरी अपवर्तीत होऊन  दोन थरांच्या सीमेलगत प्रवास करतात आणि पुन्हा अपवर्तीत होऊन शोधकापर्यंत पोहोचतात. लहरी जवळच्या अंतरावरील शोधकापर्यंत सरळपणे पोहोचतात तर लांबच्या शोधकापर्यंत अपवर्तीत लहरी प्रथम पोहोचतात. लहरींचे प्रक्षेपण आणि प्रथम आगमनातील कालावधी नोंदविला जातो. प्रक्षेपक व शोधक यांमधील अंतर व ह्या कालावधीचा उपयोग करून प्रत्येक थरामधील लहरींच्या गतीचा अभ्यास केला जातो. घनता जास्त असेल तर लहरींचा वेग अधिक असतो त्यामुळे जितकी गती जास्त तितका खडक चांगल्या प्रतीचा. अशा पद्धतीने जमिनीखालच्या थरांची जाडी व प्रत कळते

अश्या सखोल अभ्यासानंतर पायाच्या खड्कांबद्दल महत्वाची माहिती घेऊन बाकी सर्व निकषांचा एकत्रितपणे अभ्यास करून धरणासाठी अनेक योग्य जागांचा विचार केला जातो. आणि नंतर सर्वात योग्य जागा निवडली जाते.

____________________________

<html><head><body bgcolor="white"><font size="4" color="red"><b><marquee>☬ I Hope this Answer Will Helps You☬</html></head></body></font></b></marquee>

▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬▬

☜ ⓀⓐpⓘL ☞,

Answered by poojasawant9438
4

Explanation:

पाण्याचा साठा होतो . मोठ्या प्रमाणात पाणी असल्यामुळें वीज निर्मिती करता येते

Similar questions