History, asked by Anonymous, 1 year ago

धवलक्रांती म्हणजे काय ? ​

Answers

Answered by neeraj1251
3

Explanation:

कृषिप्रधान देशात सर्वाधिक उत्पन्न मिळवून देणारे पीक कोणते, असा प्रश्न विचारला तर गहू, तांदूळ किंवा ऊस अशी काही मोजकी पिके समोर येतात. मात्र, मागील काही वर्षांत झालेल्या धवलक्रांतीने शेतकऱ्यांचे अर्थकारणच बदलून टाकले आहे. केंद्रीय सांख्यिकी कार्यालयाच्या (सीएसओ) आकडेवारीनुसार देशातील दुग्धउत्पादक शेतकऱ्यांनी २०१४-१५ या वर्षांत तब्बल पाच लाख कोटी रुपयांचे उत्पन्न मिळवले आहे. हा वाटा देशाच्या एकूण कृषी उत्पन्नाच्या जवळपास २० टक्के एवढा आहे.

‘सीएसओ;ने नुकताच देशातील कृषी उत्पादनाची आकडेवारी दर्शविणारा अहवाल प्रसिद्ध केला आहे. यामध्ये दूध उत्पादनाने कडधान्ये, डाळींच्या एकूण उत्पादनावर मात केल्याचे स्पष्ट झाले आहे. पंधरा वर्षांपूर्वी १९९९-२००० मध्ये दुग्धोत्पादन केवळ ८८ हजार ०९२ कोटी रुपये एवढे होते. याच काळात कडधान्यांचे उत्पादन १ लाख ३४ हजार ०९६ कोटी रुपये होते. तर तांदूळ ७० हजार ४१६ कोटी आणि गहू ४६,२२४ कोटी रुपये होते. आज हरित क्रांतीमुळे धवलक्रांतीलाही चालना मिळाल्याने शेतकऱ्यांचे उत्पन्न कमालीचे वाढले आहे. शेतकऱ्यांना मिळणाऱ्या प्रत्येक पाच रुपयांमागे १ रुपया हा दुधाच्या उत्पादनातून मिळत आहे. कोणत्याही पिकाची किंमत ही त्याच्या गरजेनुसार आणि बाजारामधील मागणीनुसार ठरत असते. दुधाला मिळणाऱ्या भावामागेही अशीच मोठी तीन कारणे असून यामुळेच दुग्धोत्पादनाने शेतकऱ्यांमध्ये महत्त्वाचे स्थान निर्माण केले आहे.

महत्त्वाचे म्हणजे, काही वर्षांपूर्वी दूध हेही नकदी पीक असेल याचा स्वीकार केला जात नव्हता. कारण दूध हे प्राण्यांपासून मिळते. परंतु, शेतकऱ्यांमध्ये सहकार चळवळीतून झालेल्या जागृतीमुळे प्राण्यांपासूनही अर्थार्जन होऊ शकते, यावर त्यांचा विश्वास बसला. यानंतर शेतकरी आपसूकच गाय, म्हैस पाळून दुधापासून उत्पन्न मिळवू लागला आहे. दुसरे महत्त्वाचे कारण म्हणजे, दूध हे तांदूळ, गहू किंवा उसासारखे क्विंटलमध्ये मोजता येत नाही. ते लिटरमध्ये मोजतात. तसेच दुधापासून वर्षभर उत्पन्न मिळत राहते. ते हंगामी पिकांसारखे नसते. तसेच दुधाची मागणी सण, कार्यक्रमांमध्ये मोठय़ा प्रमाणावर असते. यामुळे शेतकऱ्यांना दररोज पैसा मिळू लागल्याने शेतकरी या व्यवसायाकडे वळल्याचे या अहवालात नमूद करण्यात आले आहे.

तिसरे कारण म्हणजे, शासनाच्या इतर पिकांबाबतच्या बदलणाऱ्या योजना, दुधाळ जणावरे पाळण्यासाठी सरकारकडून देण्यात येणारे अनुदान, वैद्यकीय मदत, दुग्धालये हे आहे. यामुळे एकदा मशागत करून तीन-चार महिने किंवा दीड वर्ष उत्पादनाची वाट पाहण्यापेक्षा रोजच काम करून उत्पन्न मिळविण्याकडे शेतकऱ्यांचा कल वाढला असल्याचे निरीक्षण या अहवालामध्ये नमूद केले आहे.

स्पष्ट चित्र.. कडधान्यापासून एकूण ४ लाख ८६ हजार ८४६ कोटींचे उत्पन्न मिळाले आहे. तर, दुधापासून ४ लाख ९५ हजार ८४१ कोटी रुपयांचे उत्पन्न मिळाले आहे. तिसऱ्या क्रमांकावर तांदळाचे उत्पन्न असून ते २ लाख २६ हजार ४८१ कोटी एवढी आहे. तर गव्हापासूनचे उत्पन्न १ लाख २८ हाजार ९९८ कोटी रुपये मिळाले आहे. यावरून दुग्ध उत्पादनातून शेतकऱ्यांना जास्तीचे उत्पन्न मिळत असल्याचे स्पष्ट होत आहे.

फलोत्पादनही वाढले

याच दीड दशकाच्या काळात शेतकरी फलोत्पादनाकडे वळला आहे. २०००च्या तुलनेत २०१५ मध्ये शेतकऱ्यांचे उत्पन्न जवळपास ५ पटींनी वाढले आहे. भाज्यांच्या उत्पादनानेही अन्नधान्याला मागे टाकले आहे. मच्छीमारी व्यवसायातही जवळपास ६० टक्क्य़ांची वृद्धी पाहायला मिळाली आहे. यानंतर कुक्कुटपालन, बकरी-मेंढीपालनासारख्या व्यवसायानेही कमालीची झेप घेतली आहे. मांस, मासे उत्पादनाने ऊस उत्पादनाला मागे टाकल्याचे या अहवालात नमूद केले आहे.

Answered by Anonymous
7

Answer:

धवलक्रांती ....

I HOPE It Will HELP YOU MATE

Attachments:
Similar questions