to bell the cat meaning in marathi
Answers
Answer:
to bell the cat mean
to make the trouble come our side
Explanation:
like in HINDI we say
aa bal mujhe mar
To bell the cat meaning in Marathi
मांजराच्या गळ्यात घंटा कोण बांधणार ?
ही मराठीतली एक प्रचलित म्हण आहे. जेव्हा धोक्याचे काम असते तेव्हा कोणीही ते काम करायला पुढे येत नाही.
एका गोष्टीवरून ही म्हण प्रचलित झाली. एकदा सगळ्या उंदरांनी ठरवले की आपल्याला मारायला टपलेल्या मांजराला मारायचे. पण हे काम करणार कसे? कारण मांजर अगदी चोरपावलाने येऊन उंदीर मारत असे. मग सर्वानुमते असं ठरलं की या मांजराच्या गळ्यात घंटा बांधायची जेणेकरून ती आसपास आली की घंटा वाजेल आणि आपल्याला सावध होता येईल.
मग एका उंदराने जाऊन घंटा आणली. पण ती घंटा मांजराच्या गळ्यात बांधणार कोण ? यावरून परत भांडणं होऊ लागली. कारण मांजराच्या गळ्यात घंटा बांधणे हे जोखमीचे काम होते. घंटा बांधायला जो उंदीर जाईल त्याला त्या मांजरीने हमखास मारून खाल्ले असते.
या गोष्टीवरूनच ही म्हण अस्तित्वात आली.