Social Sciences, asked by sushree2033, 1 month ago

Topic- Under topic #MAJHA Maharashtra,
Theme - History Geography ,culture,cuisine,etc.
Work- Creative Writing-( One paragraph )
Language -Marathi
Word Limit -200
Note:Use A4 sheet or coloured paper.

Answers

Answered by NithishTheking0382
1

Answer:

hi sushree how are you

Explanation:

which standard are you studying

I am (my/name/is/in/profle)

very good morning

Top tips for creative writing

1 Write about what you know. Beginning writers always get told 'write what you know', but it's good advice. ...

2 Write about what you don't know. ...

3 Read widely and well. ...

4 Hook your readers. ...

5 Get your characters talking. ...

6 Show rather than tell. ...

7 Get it right first time. ...

8 Keep polishing.

bye

Answered by мααɴѕí
3

Answer:

1) माझा महाराष्ट्र निबंध |

मंगल देशा! पवित्र देशा! महाराष्ट्र देशा!

प्रणाम घ्यावा माझा हा, श्री महाराष्ट्र देशा ||

1 मे 1960 ला महाराष्ट्र राज्याची स्थापना झाली. तरीही यापूर्वीच महाराष्ट्राला मोठा इतिहास लाभला होता. महाराष्ट्र म्हणजे महान राष्ट्र. हिंदवी स्वराज्याचे संस्थापक व महान योद्धा छत्रपती शिवाजी महाराज, दलितांचे कैवारी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, स्त्री शिक्षणाचे जनक महात्मा ज्योतिबा फुले, स्त्री शिक्षणाच्या प्रणेत्या सावित्रीबाई फुले, जहाल मताचे प्रवर्तक लोकमान्य टिळक, स्वातंत्र्यवीर सावरकर अशी अनेक अनमोल रत्ने याच मातीत जन्माला आली. संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम या सारख्या ज्ञानी संतांनी सुद्धा इथेच जन्म घेतला.

गानसम्राज्ञी लता मंगेशकर, क्रिकेटचा देव सचिन तेंडुलकर, विक्रमादित्य सुनील गावस्कर, भारतीय चित्रपट सृष्टीचे जनक दादासाहेब फाळके, स्वर सम्राट पंडित भीमसेन जोशी व अविरत समाजकार्य करणारे बाबा आमटे इत्यादी सर्वांचा महाराष्ट्राला सार्थ अभिमान आहे. त्यांनी आपल्या शौर्याने कर्तबगारीने महाराष्ट्राचे नाव जगात अजरामर केले

माझा महाराष्ट्र डोंगरदऱ्यांनी, शिवबाच्या गड-किल्ल्यांनी सजला आहे. गोदावरी सारख्या मोठ्या नद्या अजिंठा-वेरूळ सारखी देखणी प्राचीन लेणी, विद्येचे माहेरघर पुणे, अमाप निसर्गसौंदर्याने नटलेला कोकण महाराष्ट्राचे वैभव आहे.मुंबई महाराष्ट्राची राजधानी व भारताची आर्थिक राजधानी आहे. नागपुर ही महाराष्ट्राची उप राजधानी आहे. महाराष्ट्रातील उंच शिखर कळसुबाई 1646 मीटर उंच आहे. महाराष्ट्राचा लोकसंख्येच्या बाबतीत दुसरा क्रमांक तसेच क्षेत्रफळात तिसरा क्रमांक लागतो. महाराष्ट्र भारतीय चित्रपट आणि टेलिव्हिजन उद्योगाचे एक प्रमुख केंद्र आहे. ज्यामुळे राज्याला दरवर्षी देश-विदेशातून करोडो रुपयांचा महसूल प्राप्त होतो. माझ्या महाराष्ट्राचे राज्य फूल ताम्हण तर राज्यफळ आंबा आहे.

मराठी भाषा महाराष्ट्राची समृद्ध भाषा, मायबोली आहे. महाराष्ट्राचा राज्य प्राणी शेकरू तर राज्यपक्षी हरियाल आहे. गणेश चतुर्थी हा महाराष्ट्रातील महत्वपूर्ण सण आहे. हा उत्सव संपूर्ण महाराष्ट्रात दहा दिवस मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. असा हा सर्वांगसुंदर महाराष्ट्र मला अत्यंत प्रिय आहे.

बहु असोत सुंदर संपन्न की महा |

प्रिय आमचा एक महाराष्ट्र देश हा ||

Similar questions