India Languages, asked by dhruv7170, 4 months ago

Topics for Marathi Oral ( any 1 )
१.वाचन केलेल्या व आवडलेल्या कोणत्याही एका पुस्तकावर स्वमत.
२.पाठ्यपुस्तकातील कोणत्याही एका पाठावर किंवा कवितेवर विचार मांडणे.
३.गेल्या वर्षभरात तुमच्या आयुष्यात झालेले बदल.​

Answers

Answered by tanutapkir
13

Answer:1] श्यामची आई हे पुस्तक सुंदर आणि सुरस असून, त्यात साने गुरूजींनी हृदयातील सारा जिव्हाळा ओतलेला आहे. मातेबद्दल असणाऱ्या प्रेम, भक्ति व कृतज्ञता अशा अपार भावना 'श्यामची आई' या पुस्तकात साने गुरुजींनी मांडलेल्या आहेत. हे पुस्तक वाचून वाचकांचे डोळे व हृदय भरून येईल. हे पुस्तक ही एक सत्यकथा आहे. नाशिक तुरूंगात साने गुरूजींनी या कथा लिहिण्यास ९ फेब्रुवारी १९३३ (गुरुवार) रोजी सुरुवात केली आणि १३ फेब्रुवारी १९३३ (सोमवार) पहाटे त्या लिहून संपविल्या. मातेचा महिमा हे या पुस्तकातील मध्यवर्ती सूत्र आहे. त्याबरोबरच सुसंस्कृत व बाळबोध घराण्यातील साध्या, सरळ व रम्य संस्कृतीचे चित्रही यात आले आहे.

3] कोरोना विषाणूमुळे आलेल्या आरोग्य आणीबाणीमुळे जगभरातील वेगवेगळ्या समाजांमध्ये आजार आणि मृत्यूबरोबरच भीतीही शिरकाव करते आहे. ही भीती अनेकदा रोग आणि त्यामुळे होणाऱ्या मृत्यूपेक्षाही भयंकर असते, आणि हीच भीती माणसाच्या हातून चुका घडवून आणते. कोरोनाच्या या संकटकाळात भीती मानवता आणि माणुसकी यांचा पराभव करताना दिसतेय. आपण आपल्याच माणसांच्या मदतीसाठी धावून जाताना दिसत नाही, यामागेही भीती हेच कारण आहे. आज आपण इतरांसाठी हजर आहोत तर ते केवळ SMSद्वारे, सहवेदना व्यक्त करणारे इमोजीद्वारे आणि सोशल मीडियावरून देण्यात येणाऱ्या अमाप उपायांच्या स्वरूपात - स्मार्टफोन्स, व्हीडिओ किंवा ऑडियो संदेश हीच आजच्या संवादाची, सहवेदनेची भाषा झाली आहे.या भीतीने मानवाला अदृश्य केलं आहे आणि याच भीतीने व्हर्च्युअल रिअलिटी आणि व्हर्च्युअल जगाचा मोठ्या प्रमाणावर विस्तार केला आहे. याच भीतीने आपल्याला त्या जागी नेऊन सोडलं आहे जिथे आपल्याला परस्परांची भीती वाटू लागली आहे. आपण एकमेकांना 'बायोलॉजिकल बाँब'च्या स्वरूपात बघू लागलोय. याच भीतीने आपल्या मानवीय देहाचं बायोलॉजिकल देहामध्ये अवमूल्यन केलंय, किंवा आपण म्हणू रूपांतर केलंय. काही दिवसांपूर्वीच दिल्ली, मुंबई, पुणे यासारख्या शहरांमध्ये कोरोनामुळे निर्माण झालेली परिस्थिती, ठप्प झालेला कामधंदा आणि कामाच्या गावी रहायला घर नसणे, या अडचणी आणि असुरक्षिततेच्या भीतीमुळे अनेकांनी आपापल्या गावांची वाट धरली.

Answered by baludhonde11
2

Answer:

वाचन केलेल्या व आवडलेल्या कोणत्याही एका पुस्तकावर स्वमत. 50 ओळी

Similar questions