English, asked by yr218268, 7 months ago

tree essy in marathi​

Answers

Answered by santhoshnpanchal8
1

Answer:

मानव आणि पर्यावरण यांचे अतूट नाते आहे. या पर्यावरणावर मानव पूर्णपणे अवलंबून आहे. पृथ्वी हा एक असा ग्रह आहे, ज्यावर मानव जीवन आहे.

त्याच बरोबर मानवाला आपले जीवन जगण्यासाठी सगळ्या गोष्टी उपलब्ध आहेत. जसे कि पाणी, भूमी, हवा या धरतीवर वृक्ष हे पर्यावरणाचा महत्वाचा घटक आहेत. वृक्ष मानवाच्या जीवनात आपली महत्वपूर्ण भूमिका निभावतात.

म्हणून संतानी म्हटले आहे कि, “वृक्ष वल्ली आम्हा सोयरे वनचरी” “कांदा मुळा भाजी अवघी विठाई माझी” असे निसर्गाबद्दलचे प्रेम व्यक्त केले आहे.

Answered by arunabalamohapatra
3

Answer:

नमस्कार मित्र-मैत्रिणींनो आज आपण वृक्ष आपले मित्र मराठी निबंध बघणार आहोत. या निबंधात मानवाला जिवन जगण्‍यासाठी वृक्ष किती उपयोगी आहेत याचे महत्‍व पटवुन सांंगीतले आहे चला तर मग सुरूवात करूया निबंधाला.

वृक्षांची महती आपल्या भारतात प्राचीन काळापासून सांगीतली गेली आहे. तुकाराम महाराजांना तर वृक्ष हे आपले सगेसोयरे वाटतात. असे हे वृक्ष आज या आधुनिक विज्ञानयुगातही- आपले जिवलग मित्र आहेत.

विज्ञानामुळे माणसाने खूप प्रगती केली पण या विकासासाठी माणसाने अविचाराने जंगलतोड केली. आपण आपल्या या वृक्षमित्राचा घात केल्याने स्वत:वरच दुष्काळाचे, प्रदूषणाचे संकट ओढवून घेत आहोत, याचा माणसाला विसर पडलेला आहे. वृक्ष ही निसर्गाची फुप्फुसे आहेत. हवेतील कार्बन डायऑक्साइड शोषून घेतात आणि 'प्राणवायू' हवेत सोडून हवा शुद्ध करण्याचे काम करतात. यामुळे माणसाचे जगणे सुकर व सुखी झाले आहे.वृक्ष आपल्याला सहस्र हातांनी मदत करतात. अन्न, वस्त्र, निवारा या मूलभूत गरजा तर ते भागवतातच; शिवाय आपल्या पूजाविधीसाठी नानाविध साहित्य देऊन आपल्याला सुखावतात. आज वनस्पतींपासून मिळालेल्या अनेक औषधींचा उपयोग करून माणसाने असाध्य आजारांवर मात केली आहे.

स्वतः जळून हे वृक्ष इतरांच्या उपयोगी पडतात. वृक्षाचा प्रत्येक अवयव माणूस, प्राणी, पक्षी यांना उपयुक्त आहे. वृक्षांजवळ भेदभाव नसतो. ते सर्वांना समान वागणूक देतात. अगदी त्याच्या अंगावर घाव घालणाऱ्या कुन्हाडीचे पातेही तो सुगंधित करतो. मानवाच्या एकाकी जीवनातही वृक्ष साथसंगत देतात. माणूस आपल्या अनेक आठवणी या वृक्षांशी जपून ठेवतो. तो त्यांच्याशी हितगूज करतो. असे हे वृक्ष मानवाचे जिवलग मित्र आहेत.

मित्रांनो तुम्‍हाला हा निबंध कसा वाटला व वृक्षारोपण करण्‍यासाठी आणखी काय उपाय योजना करायला पाहीजे हे तुम्‍ही कमेंट करून सांगु शकता . धन्‍यवाद

Similar questions