Tum Hi kelela Jungle Pravas nibandh
Answers
■■ मी केलेला जंगलचा प्रवास■■
गेल्या वर्षी उन्हाळ्याच्या सुट्टींमध्ये मी माझ्या आत्याच्या गावी राहायला गेलेली.दुपारी गप्पा मारत असताना,आम्ही भावंडांनी गावामध्येच असलेल्या जंगलात जायचे ठरवले.दुपारी ४ च्या सुमारास आम्ही जंगलात जायला निघालो.
जंगलात असलेली मोठमोठी झाडे,शांतता,हिरवळ आणि थंड वातावरणाची मजाच निराळी होती.वेगवेगळ्या पक्ष्यांची आवाजं ऐकू येत होती.जसजसे आम्ही जंगलाच्या आत जात होतो,तसे ते जंगल घनदाट होत चाललेले.
थोडं आत गेल्यावर आम्हाला एक तलाव दिसले.तिथे आम्ही थोडी विश्रांती घेतली आणि घरातून आणलेले खाऊ खाल्ले.मग आम्ही त्या पाण्यात उड्या मारल्या आणि पोहायला लागलो.
पोहत असताना मी सगळे काही विसरून गेलेली आणि फक्त त्या वातावरणाचा आस्वाद घेत होती. तेव्हाच धो धो पाऊस पडायला लागला.पावसाने आमच्या आनंदात भर घातली.
बघता बघता अंधार होऊ लागला आणि आम्ही घरी यायची तयारी करू लागलो.वेळ कसे निघून गेले काही कळालेच नाही आणि अशा प्रकारे माझा हा जंगलचा प्रवास खूप मजेदार ठरला.