tumhala kon vhavese vatate essay in marathi
Answers
Answer:
sorry I don't know Marathi
plz mark as brainliest
Answer:
माणूस म्हणून जन्माला आला आहेस तर माणूस म्हणून जगावे असा उपदेश प्रत्येक ठिकाणी ऐकायला मिळतो. घरात वाडवडील तेच सांगतात, शाळेत शिक्षक तेच माणुसकीचे धडे देतात, समाजात प्रतिष्ठित मंडळी सुद्धा त्याच विषया वर बोलताना दिसून येतात. संत, महात्मा, किंवा विचारवंत देखील याच विषयी लोकांना मार्गदर्शन करतात. पण तरी देखील माणुसकी नावाची वस्तू प्रत्येक ठिकाणी का दिसत नाही असा एक प्रश्न मला नेहमी पडत आला आहे आणि त्याचे उत्तर अजून तरी सापडले नाही असेच म्हणावे लागेल. कारण आज ही बरेच लोकांना माणुसकी काय असते हे कळले नाही असे वाटते. त्यामुळे सर्वप्रथम मला माणूस व्हावेसे वाटते, येथूनच मग खऱ्या माणुसकीला प्रारंभ होते.
ग्रामीण भागात वावरत असताना पदोपदी माणुसकीचा अनुभव येतो आणि त्या अनुभवाने माणूस प्रगल्भ बनतो. एकमेका सहाय करू अवघे धरु सुपंथ याची खरी प्रचिती ग्रामीण भागात दिसून येते. माणुसकी नावाची वस्तू आजही जिवंत आहे ते फक्त ग्रामीण भागात. एकमेकाबद्दल प्रेम, माया, ममता, आपुलकी या सर्व बाबी मला शहरापेक्षा ग्रामीण भागात जास्त दिसून येते. शहरात प्रत्येकजण फक्त धावत असतो. कधी कधी तर तो कुठे आणि कशासाठी धावतो हेच त्याला माहित नसते. पैशाच्या बळावर सर्व मिळविता येते, या विचारातून माणुसकी मिळविण्याचा प्रयत्न असफल होतो कारण माणुसकी ही विकत मिळणारी वस्तू नाही.
आज माणूस पैसा कमाविण्यासाठी माणुसकी ही विसरून चालला आहे. म्हणून वाटते की सर्व प्रथम माणूस व्हायला शिकणे आवश्यक आहे. घरातील मुलांना अगदी लहानपणापासून मानवतेची शिकवण देणाऱ्या बाबी जाणीवपूर्वक केल्या तर त्यांचा अनुकूल परिणाम आपणास पाहण्यास मिळेल. लहान मुले खूपच संवेदनशील असतात. टीप कागद प्रमाणे सर्व छोट्या छोट्या बाबी आत्मसात करतात. याचा आपण जरासे देखील विचार न करता त्यांच्या समोर कसे ही वागले जाते. ज्याचा की लहान मुलांवर विपरीत परिणाम होतो. पुन्हा आपणच म्हणणार की आजकालची पोरे खूपच फास्ट आहेत, मुले बिघडली आहेत असे बोलतो. त्यांना कोणी बिघडविली ? आपणच. आपली माणुसकी संपली की आपण कसे ही वागतो आणि त्याचा प्रभाव आपल्या सोबत असलेल्या बालकावर पडत असते. तीच पिढी माणुसकीहीन वागायला सुरु करते. त्यामुळे आई आणि वडिलांनी मुलांचे काळजीपूर्वक संगोपन करणे आवश्यक आहे. गरजू व्यक्तीला मदत करणे ही खरी माणुसकी पण गरजू माणसे ओळखावी कशी ? हा ही एक प्रश्न आहे. जो उठतो तो मी गरीब आहे मला मदत करा असे म्हणतो. देशात भिकारी लोकांची संख्या तर एवढी वाढली की ज्याला काम करावेसे वाटत नाही ते हातात कटोरा घेऊन भीक मागण्यास तयार होत आहे. रेल्वेस्थानक, बसस्थानक या ठिकाणी यांची भरमसाठ संख्या वाढू लागली. मग या सर्वावर कुणी माणुसकी का दाखवित नाहीत. यांचे वर जर माणुसकी दाखवायला हवी पण तसे होत नाही. कारण काही खोटी मंडळीनी ही हा सोपा मार्ग धरला आहे पैसे कमविण्यासाठी. सामाजिक कार्य हातात घेऊन काम करीत असताना माणूस म्हणून जगण्याचा आनंद मिळतो यात शंका नाही. म्हणून बरेच लोक या सामाजिक कार्यात सर्वस्वी अर्पण करून काम करीत आहेत. ते प्रसिध्दीसाठी असे कार्य अजिबात करीत नाही. तर त्यातून त्यांना निस्वार्थ सेवा करायची आहे. आपण कधी इतरासाठी एक क्षण काम केले आहे काय ? हे स्वतः च्या मनाला विचारून पहा. नेहमी स्वतःसाठी आणि स्वतः च्या कुटुंबासाठी जगत असताना इतरांना वेळ देताच आले नाही तेंव्हा आपणा काय माहित ? खाने, पिने, उठने, बसने, झोपणे या सर्व क्रिया मी करतो तसे प्राणी आणि पक्षी देखील करतात मग त्यांच्यात आणि माझ्यात फरक तो काय हे समजून जो वागतो तो माणूस. म्हणून मित्रांनो मला नेहमी माणूस व्हायला आवडते आणि तुम्हाला
hope it's helpful for you.
follow me.