Tumla samjle la saku aji ch vykti Chitra tumchya shabdat liha in Marathi
Answers
सखूआजीच्या व्यक्तिमत्त्व विशेष
सखू आजीचे वर्णन करताना लेखकांनी तिच्या अनेक व्यक्तिमत्त्व विशेषांचे वर्णन केलेले आहे. सखू आजीचा स्वभाव आणि तिचे गावातील प्रत्येकाशी असणारे नाते आपल्याला तिच्याबद्दल खूप काही सांगून जाते. करारी स्वभावाची परंतु तितकीच प्रेमळ असणारी सखू आजी आपल्याही मनात घर करून जाते.
सखू आजी ही नव्वद वर्षाची, कमरेत वाकलेली, काठीच्या आधाराने चालणारी आणि चेहऱ्यावर सुरकुत्या असलेली होती. सहज कोणाशीही बोलून त्या व्यक्तीला आपलेसे करून घेणाऱ्या सखू आजीचं हा व्यक्तिमत्व विशेष मला भावला. कविता करत बोलणाऱ्या सखू आजीकडे खूप प्रतिभा होती. बुद्धिवान अश्या ह्या सखू आजीसोबत प्रत्येकालाच बोलावेसे वाटे.
सखू आजीचा मला भावलेला दुसरा व्यक्तिमत्व विशेष म्हणजे तिचा धीटपणा. प्रेमळ स्वभावाची असणारी सखू आजी वेळप्रसंगी एखाद्याला सुनवायला मागेपुढे पाहत नसे. आपल्या धारदार शब्दांनी ती सर्वांना धाकात ठेवत असे. तिच्या शब्दापुढे कोणाचे काही चालत नसे.
लेखक राजन गवस 'सखू आजी' या पाठात आपल्या गावातील सखू आजीबद्दल सांगतात. नव्वदीच्या घरात असलेली सखू आजी कशी सर्वांना हवीहवीशी वाटायची हे आपल्याला यातून दिसून येते.