Chemistry, asked by jadhavkaran801, 1 month ago

उजवे वृक्क हे डाव्या वृक्का पेक्षा थोडे वर असते? ​

Answers

Answered by s1274himendu3564
0

वृक्क : (मूत्रपिंड). पृष्ठवंशी ( पाठीचा कणा असलेल्या ) प्राण्यांमध्ये चयापचयातून ( शरीरात सतत घडणाऱ्या भौतिकीय व रासायनिक घडामोडींतून ) निर्माण झालेले अनावश्यक पदार्थ शरीराबाहेर टाकण्यासाठी आणि सोडियम, पोटॅशियम, क्लोराइड इत्यादींचा, तसेच पाण्याच्या अतिरिक्त संचयाचा निचरा करण्यासाठी वृक्कांची जोडी विकसित झालेली आहे. ⇨उत्सर्जनाच्या या क्रियेमुळे शरीरातील द्रवांचा ⇨तर्षण दाब व अम्ल-क्षार (अल्कली) संतुलन टिकविण्यास मदत होते. याशिवाय सस्तन प्राण्यांमध्ये काही ⇨ हॉर्मोनांची ( अंतःस्रावी ग्रंथीतून स्रवणाऱ्या उत्तेजक स्रावांची ) निर्मिती करून रक्तदाब व रक्तकोशिकांची (रक्तपेशींची) निर्मिती यांच्या नियंत्रणातही वृक्काचा सभाग आढळतो.

अपृष्ठवंशी (पाठीचा कणा नसलेल्या ) प्राण्यांमध्ये केवळ अपचयी पदार्थांच्या [→ चयापचय] उत्सर्जनाचे कार्य करणाऱ्या साध्या वृक्कक नलिका असतात उदा., ⇨अँफिऑक्सस हा सागरी प्राणी. सागरातून स्थलांतर करून हे प्राणी जसे गोड्या पाण्यात येऊ लागले, तशी शरीरात शिरणाऱ्या अतिरिक्त ( लवणरहित ) जलाचा निचरा करण्यासाठी वृक्कक नलिकांमध्ये रक्त गाळण्यासाठी अतिलहान रक्तवाहिन्यांचे पुंजके म्हणजे केशिकागुच्छ विकसित झाले. हेच प्राणी परत समुद्रात शिरले, तेव्हा अतिरिक्त लवणांचे उत्सर्जन करणारे काही भाग नलिकांमध्ये निर्माण होऊ लागले. भूपृष्ठावर प्राण्यांचा संचार सुरू झाल्यावर या नलिका पाणी टिकवून धरण्याचे कार्य करू लागल्या, असे समजले जाते. कनिष्ठ पृष्ठवंशी प्राण्यांमध्ये ३ ते ५ नलिकांनी बनलेले वृक्क ( आदिम वृक्क ) हृदयापाशी असते. मासे व बेडुक यांच्यात ते जास्त जटिल ( गुंतागुंतीचे ) व शेपटीच्या दिशेने सरकलेले आढळते. सरपटणारे प्राणी, पक्षी आणि सस्तन प्राणी यांच्यामध्ये या इंद्रियाचा पूर्ण विकास होऊन ते पश्चवृक्क या नावाने ओळखले जाते.

शारीर : मानवी शरीरात वृक्कांची जोडी पर्युदरपटलाच्या [उदर व त्याच्या तळाशी असणाऱ्या पोकळीच्या अस्तराच्या → पर्युदर] मागे उदरपोकळीच्या मागील भित्तीस टेकलेली आढळते. प्रत्येक वृक्क घेवड्याच्या दाण्याप्रमाणे लंबगोलाकृती व चपटे असून त्याच्या आतील बाजूच्या (अभिमध्याकडील) अंतर्गोल खळग्यास वृक्कनाभी म्हणतात. वृक्काचे सरासरी आकारमान १२ X ६ X ३ सेंमी असते. पोटाच्या वरच्या भागात उरोस्थीच्या ( छातीच्या हाडाच्या ) टोकाचा खळगा आणि बेंबी यांच्यापासून समान अंतरावर आडवी रेघ काढली, तर तिच्यातून जाणाऱ्या प्रतलास (जठरनिर्गमद्वार प्रतलास ) वृक्काच्या नाभिपातळीची खूण म्हणता येईल. पहिल्या कटि-मणक्याच्या (कंबरेच्या मणक्याच्या ) खालच्या कडेतून जाणाऱ्या या प्रतलाच्या किंचित वर डाव्या वृक्काची नाभी व किंचित खाली उजव्या वृक्काची नाभी, अभिमध्यापासून प्रत्येक बाजूस सु. ५ सेंमी. अंतरावर आढळतात. श्वसनाच्या हालचालींबरोबर त्यांची सु. २ सेंमी. खालीवर हालचाल होते.

उदरपोकळीच्या विच्छेदनात अथवा शस्त्रक्रियेत वृक्काचा रंग लालसर पिंगट आणि पृष्ठभाग सभोवती असलेल्या पातळ पटलाच्या संपुटामुळे (पिशवीसारख्या संरचनेमुळे) चकचकीत दिसतो. संपुटाच्या बाहेर परंतु वृक्कीय प्रावरणाच्या आत परिवृक्कीय चरबीचा घट्ट थर आढळतो. शरीरातील इतर चरबीपेक्षा ही जास्त घन असल्याने हा थर वृक्कास फार हलू देत नाही. शरीराचे वजन फार मोठ्या प्रमाणात घटल्यास ही चरबी कमी होऊन वृक्काची चलता (हालचालक्षमता ) वाढते. अशा स्थितीस प्लवमान (तरते) वृक्क म्हणतात.

वृक्काच्या नाभीमधून तंत्रिका तंतू (मज्जातंतू) आणि वाहिन्या प्रवेश करतात. त्यांपैकी सर्वांत पाठीमागच्या बाजूस मूत्रवाहिनीचे विस्तारलेले वरचे टोक असते. नसराळ्याच्या आकाराच्या या भागास वृक्कद्रोण म्हणतात. या द्रोणाच्या वरच्या भागापासून दोन किंवा तीन विस्तार वृक्काच्या मुख्य भागात म्हणजे ऊतकात (समान रचना व कार्य असलेल्या कोशिकासमूहात ) प्रवेश करतात आणि त्या प्रत्येकाचे तीनचार उपविस्तार असतात. त्यांना अनुक्रमे महाकटोर व लघुकटोर (मोठा व लहान मूत्रकलश) संबोधले जाते. लघुकटोराच्या पोकळीत वृक्कीय ऊतकाच्या कोणस्तूपाकृती ( पिरॅमिडच्या आकारच्या ) खंडाचे निमुळते टोक अंकुरकाच्या रूपात उघडते. त्यातून मूत्राचे सूक्ष्म थेंब कटोरात झिरपत असतात. वृक्कद्रोणाची क्षमता सु. ५ मिलि. असते. त्याच्या भित्तिकेत अरेखित स्नायू असल्याने लघुकटोरापासून मूत्रवाहिनीपर्यांत सर्व भागाचे आकुंचन-प्रसरण होऊ शकते.

रोहिणीच्या पुढे नाभीतील सर्वांत अग्रभागी वृक्कीय नीला बाहेर पडते व अधोमहानीलेस जाऊन मिळते. पाचसहा खंडीत नीला एकत्र येऊन वृक्कीय नीला तयार झालेली असते व या खंडीय नीलांमध्ये परस्परांना जोडणाऱ्या संयोजी नीलाही अनेक असतात. वृक्कीय लसीकावाहिन्या [→ लसीका तंत्र] नीलांच्या बरोबरच बाहेर पडून महारोहिणीच्या जवळ असलेल्या लसीका ग्रंथींना मिळतात. स्वायत्त ⇨तंत्रिका तंत्राच्या अधोजठरीय आणि उदरगुहीय जालिकांमधून निघालेल्या वृक्कीय तंत्रिका नाभीतून वृक्कांत शिरतात आणि रक्तवाहिन्यांच्या संकोचनाने रक्तदाब नियंत्रित करतात. संवेदनावाहक अभिवाही तंत्रिकांचे तंतू⇨मेरूरज्जूच्या वक्षकटीय भागास जोडलेले असतात. त्यामुळे वृक्क आणि वृक्कद्रोणाच्या विकारांमध्ये जाणवणारी वेदना पाठीत शेवटच्या बरगडीजवळ सुरू होऊन उदराच्या पुढील भागाकडे पसरत जाते व तेथून खाली जननेंद्रियांच्या दिशेने उतरते. वृक्कनाभीतही एक तंत्रिका गुच्छिका आढळते. परानुकंपी तंत्रिकांचा पुरवठा बव्हंशी मेरूरज्जूच्या अंतिम ( त्रिकीय ) भागातून होत असतो परंतु काही तंतू वरून, प्राणेशामधूनही मिळत असतात. त्यामुळे वृक्काच्या वेदनांबरोबर कधी-कधी मळमळणे, उलटी होणे यांसारखी जठरांत्रीय ( जठर व आतडे यांची ) लक्षणेही निर्माण होतात.

Give me some multiple thanks please

Similar questions