ulva information in marathi
Answers
Answer:शैवले : (शैवाल लॅ. अल्गी, अल्जी ). अत्यंत साधे शरीर असणाऱ्या, बहुधा गोड्या, मचूळ किंवा खाऱ्या पाण्यात किंवा त्याच्या सान्निध्यात जगणाऱ्या व स्वतंत्रपणे आपले अन्न बनविणाऱ्या हिरव्या वनस्पतींना शैवले म्हणतात. रंगहीन अशा थोड्या वनस्पतींचा अपवाद वगळता शैवलांपैकी कित्येकांचा मूळचा हिरवा रंग इतर रंगद्रव्यांमुळे झाकाळला जातो. इंद्रधनुष्यातील सात रंगांपैकी एखादा रंग दर्शविणाऱ्या काही शैवलांच्या जाती सामान्यपणे समुद्रकिनारी आढळतात. इतर अबीजी वनस्पतींशी तुलना केल्यास, शैवलांची पुनरूत्पादक अंगे अत्यंत साधी व एका कोशिकेची बनलेली असतात.
शैवलांच्या सु. २०,००० जातींची नोंद झालेली आहे. त्यांची शारीरिक संरचना साधी असूनही सर्व सजीवांत आढळणाऱ्या पोषण, वाढ, प्रजोत्पादन प्रक्रिया त्यांच्या जीवद्रव्यामध्येही आढळत असल्यामुळे शरीरक्रियाविज्ञानाच्या दृष्टीने शैवले जटिल ठरतात. ⇨ कवकां मध्ये हरितद्रव्याचा अभाव असल्याने त्यापासून त्यांचा वेगळेपणा सहज ओळखता येतो. पृथ्वीवर फार प्राचीन काळापासून शैवलांचे अस्तित्व असून इतर सर्व वनस्पती त्यांच्यापासून कमविकासाने निर्माण झाल्या असाव्यात असे मानतात. याला कदाचित काही कवक अपवाद असावेत. जीवशास्त्रज्ञांच्या मते पृथ्वीवर प्रथम फक्त सजीव द्रव्याचे लहानमोठे थेंब निर्माण झाले व पुढे त्यातील काहींचा विकास हळूहळू अत्यंत साध्या शैवलांत, तर काहींचा फार साध्या प्राण्यांत व काहींचा प्रारंभिक कवकांत झाला असावा, त्यानंतर काही साध्या शैवलांचा विकास हरितद्रव्यनाशामुळे काही कवकांत, तर बहुतेक प्राण्यांचा, वनस्पतींचा व इतर बहुसंख्य कवकांचा विकास स्वतंत्रपणे व जटिल स्वरूपात झाला असणे संभवनीय आहे.
अधिवास, प्रसार व परिस्थितिविज्ञान : शैवले विशेषत: गोड्या व खाऱ्या पाण्यात आणि अंशतः जमिनीवर (किंवा उघडयावरच्या इतर वस्तूंवर) विपुलतेने आढळतात. शरीराच्या विविधतेत फक्त सूक्ष्मजंतूच काही प्रमाणात त्यांची बरोबरी करू शकतील. बहुसंख्य शैवले पाण्यात असल्याने काही ऋतूंत त्यांची संख्या फार मोठी असते. खडक, दगड, काटक्या किंवा वनस्पती व प्राणी यांना चिकटून कित्येक शैवले वाढतात, तर काही स्वतंत्रपणे मोकळ्या तरंगतात. [→ प्लवक].
काही ठराविक हवामानात असंख्य सूक्ष्म शैवले (उदा., मायक्रोसिस्टिस, नॉस्टॉक, ॲनाबीना, लिंग्बिया, ग्लोओट्रिक्रिया, सीलोस्फेरियम) पाण्यात तरंगत राहिल्याने त्यावर हिरवट झाक मारते ह्याला जलबहार म्हणतात. यामुळे ते पाणी बिघडते. काही गोड्या पाण्यातील शैवलामुळेही पाण्यास रंग येतो (उदा., क्लॅमिडोमोनस, व्हॉल्व्हॉक्स, यूग्लीना ). समुद्रात ट्रायकोडेस्मियम च्या जातीमुळे जलबहार बनतो. काही शैवलांचे हिरवे-पिवळे पुंजके संथ पाण्यावर तरंगत असलेले आढळतात. त्याला पल्वल तरंग म्हणतात. तसेच कधीकधी जलबहारातील काही जातींचा जाड थर तरंगतो. समुद्रात तरंगणाऱ्या किंवा खडकास चिकटून वाढणाऱ्या मोठया शैवलास ‘ सागरी शैवले ’ ( उदा., फ्यूकस, सरगॅसम, नेरिओसिस्टिस ) म्हणतात.
शैवले पाण्यात किती खोलवर राहू शकतात, हे सूर्यप्रकाश किती खोलवर जाऊ शकतो त्यावर अवलंबून असते. बहुतेक शैवले पाण्याच्या पृष्ठभागाखाली काही सेंमी.पर्यंतच आढळतात तथापि काही हिरवी, पिंगल व लाल शैवले पृष्ठभागाखाली सु. १०० मी.पर्यंत आढळतात. प्रत्येक जाती खाऱ्या किंवा गोड्या या दोन्हीं पैकी एकाच ठिकाणी सदैव आढळते. बहुधा गोड्या पाण्यातील सर्व जाती लहान किंवा सूक्ष्म असतात. उलट खाऱ्या पाण्यातील जाती आकाराने मोठया व म्हणून सहज ओळखता येतात. गोड्या पाण्यातील अनेक जाती विषुववृत्तापासून ते ध्रूवीय प्रदेशांपर्यंत सर्वत्र आढळतात. मात्र काही विशिष्ट ठिकाणीच आढळतात. सागरी शैवलातील चिकटून वाढणाऱ्यांपैकी ९५ टक्के जाती पिंगल किंवा लाल गटातील असतात. पिंगल शैवले महासागरातील थंड पाण्यात, तर लाल शैवले सापेक्षतः उष्ण पाण्यात अधिक आढळतात. तसेच तापमान, सूर्यप्रकाशाची तीव्रता व ओहोटीच्या वेळी सुकून जाण्याचा धोका इत्यादींमुळे सागरी शैवलांची संख्या किनाऱ्यापासून खोल पाण्याकडे क्रमश: वाढत जाते. उष्ण व उपोष्ण कटिबंधातील समुद्रात सूर्यप्रकाश अधिक खोलवर शिरत असल्यामुळे शैवले सु. १०० मी.पेक्षाही अधिक खोलपर्यंत आढळतात. याउलट अधिक वरच्या अक्षांशावरील सागरात सु. ५० मी. खाली शैवले जवळजवळ नसतात. फक्त तापमानाचा विचार केल्यास काही निळी-हिरवी शैवले ७५º - ८०º से. उष्णतेच्या झऱ्यात वाढतात तर काही बर्फात गोठलेल्या अवस्थेत काही महिने राहिलेली आढळतात. ‘ लाल बर्फ ’ हे नाव लाल दिसणाऱ्या पण मुळात हिरव्या रंगाच्या (उदा., क्लॅमिडोमोनस निविया ) शैवलामुळे पडले आहे. [→ जीवविज्ञान, सागरी].
ओलसर जमिनीवर काही शैवले वाढतात. भरपूर खतावलेल्या मातीच्या ढेकळांत खूपच शैवले असतात. पृष्ठभागाजवळ अथवा जमिनीवरच्या शैवलांना अन्ननिर्मितीसाठी सूर्यप्रकाशाची गरज असते. कमी-अधिक दाट अंधारात वाढणारी शैवले हरितद्रव्यहीन व शवोपजीवी [मृतजीवी → शवोपजीवन] असतात. भूमिगत प्रकारात मुख्यतः निळी-हिरवी व करंडकासारखी [→ डायाटम] शैवले आढळतात. काही स्थळी ती हिरवी, पिवळी व पिवळट तपकिरी रंगांचीही असतात. ‘ तांबडा समुद्र ’ हे नाव त्यात कधीकधी विपुल प्रमाणात निर्माण होणाऱ्या तांबड्या रंगाच्या पण निळ्या-हिरव्या (नील-हरित) शैवलामुळे पडले आहे.
Explanation:
ulva information in marathi