History, asked by avihukmate, 1 month ago


उपक्रम
(१) भ्रष्टाचाराला आळा घालण्यासाठी तुम्ही कोणत्या उपाययोजना
सुचवाल, त्याची यादी तयार करा.​

Answers

Answered by anushkasnarayankar09
6

Answer:

PLEASE MARK ME AS BEAINLIEST

Explanation:

टाळी कधी एका हाताने वाजत नाही. भ्रष्टाचारात सुद्धा लांच देणारा आणि घेणारा अशा दोन बाजू आहेत. देणाऱ्याने लांच देण्याचे नाकारले तर भ्रष्टाचार होणारच नाही. पण बहुतेक वेळा देणाऱ्यांची बाजू कमकुवत असते म्हणून ते लांच देत असतात.

मुख्य प्रश्न आहे तो लांच मागणाऱ्याचा. मुख्य प्रश्न आहे तो त्याला आळा कसा घालायचा. ही गोष्ट फक्त त्याचे कुटुंबियच करू शकतात कारण लांच मागणारा जर पकडला गेला, तर त्याच्या कुटुंबाची परिस्थिती फार दारुण होते.

आता PMC बँकेचा managing director जॉय थॉमसचेच उदाहरण घ्या. त्याच्या कुटुंबाला पूर्वी समाजात खूप मान असेल, त्याची पत्नी एक मोठ्या पदाधिकाऱ्याची पत्नी म्हणून मिरवत असेल, त्याच्या मुलांचे मित्र मुलांना भाव देत असतील. पण आता तो पकडला गेल्यावर त्याच्या कुटुंबाला बाहेर कुठे तोंड दाखवायला जागा उरली नसेल. त्यांना सतत लोकांचे टोमणे ऐकून घ्यावे लागत असतील.

आणि त्यातच आता अशी माहिती बाहेर आली आहे की त्याने त्याच्या P. A. शी लग्न करण्यासाठी धर्मांतर करून 'जुनैद' हे नाव घेतले आहे. परंतु ही गोष्ट गुप्त ठेवण्यासाठी त्याने कागदोपत्री नाव बदलले नव्हते. दुसऱ्या बायकोने बँकेतून राजीनामा दिल्यावर तिला पुण्याला ठेवले आणि तिला पुण्यात ९ फ्लॅट आणि एक बुटीक घेऊन दिले.

त्याच्या कुटुंबांचे आता अक्षरशः धिंडवडे निघत असतील.

अशा वेळी प्रश्न येतो की, त्याच्या बायकोला माहीत नव्हते का की आपला नवरा त्याच्या पगारापेक्षा जास्त पैसे घरात आणत आहे. साधारण समजूत असलेल्या स्त्रीला सुद्धा माहीत असते की आपला नवरा किती पगार घेतो आणि आपण किती पैसे खर्च करतो. परंतु त्यावेळी पैशाची धुंदी चढलेल्या कुटुंबाला असे वाटत नाही की आपल्या नवऱ्याला किंवा बापाला सांगावे की आमची साधे जीवन जगण्याची तयारी आहे पण तुम्ही भ्रष्टाचार करू नका. पण नवरा किंवा बाप पकडला गेला की मात्र त्याच्या पापात वाटेकरी होण्याची बायकामुलांची तयारी नसते.

महर्षी वाल्मीकींंची गोष्ट प्रसिद्ध आहे. नारदांनी जेव्हा वाल्या कोळ्याला विचारले की तू अशी लूटमार का करतोस, तेव्हा त्यांनी उत्तर दिले की कुटुंबासाठी. जेव्हा नारदमुनी म्हणाले की तू घरी जाऊन तुझ्या बायकोमुलांना विचारून ये की ते तुझ्या पापात वाटेकरी होण्यास तयार आहेत का, तेव्हा बायकोमुलांनी पापात वाटेकरी होण्याचे नाकारले.

ही गोष्ट लांच घेणाऱ्या प्रत्येक माणसांनी लक्षात ठेवली पाहिजे. तसेच आपण पकडले गेलो तर आपल्या कुटुंबाचे काय हाल होत याचा प्रत्येकाने लांच घेताना विचार करायला हवा. गेले पन्नास वर्षे मी ही गोष्ट जवळून बघत आहे. म्हणून मला इथे माझे एक निरीक्षण नोंदवायचे आहे. पूर्वीच्या पिढीतल्या अनेक अधिकाऱ्यांंच्या टेबलावर त्यांच्या बायको आणि मुलांचा ग्रुपफोटो ठेवलेला असे आणि कोणत्याही महत्वाच्या कागदावर सही करण्यापूर्वी ते त्या फोटोकडे बघत असत की आपण जी सही करतो आहोत त्याचा आपल्या कुटुंबावर काय परिणाम होईल. आता असा फोटो टेबलावर दिसत नाही.

पूर्वीचे अधिकारी फार विचारपूर्वक काम करीत असत. आताची पिढी याबाबतीत बेदरकार आहे.

Similar questions