India Languages, asked by bommu3333, 7 hours ago

उपक्रम: चुडीवाला' यासारख्या इतर व्यवसाय करणाऱ्या एखाद्या व्यावसायिकाची ।मुलाखत घ्या.​

Answers

Answered by rsrambag93
1

Answer:

correct answer is Sanskrit

Answered by rajraaz85
10

Answer:

                             भाजीवाल्याची मुलाखत

अजय : नमस्कार दादा, आज आम्हाला खूप आनंद होत आहे कि तुमच्या आयुष्यातील   अनेक पैलू लोकांसमोर येतील. कारण कुठलाही व्यवसाय उभा करणे हे सोपे नसते त्यासाठी जिद्द, चिकाटी आणि मेहनत लागते.

भाजीवाला: होय हे खरे आहे, कुठलाही व्यवसाय उभा करणे हे सोपे नसते. आणि भाजीपाला व्यवसाय करणे म्हणजे तुम्हाला त्या बद्दल पूर्ण माहिती असणे गरजेचे असते.

अजय: दादा मला सांगा तुम्ही हा भाजीपाला व्यवसाय किती वर्षापासून करत आहात?आणि तो करण्याची प्रेरणा तुम्हाला कुठून मिळाली?

भाजीवाला: मी मागच्या दहा वर्षापासून हा भाजीपाला व्यवसाय करत आहे. शेतकऱ्याचा मुलगा असल्यामुळे भाजीपाला चे महत्व अगदी लहानपणापासूनच मला माहित होते. भाजीपाला हा आपल्या जीवनातील अविभाज्य भाग आहे. आणि दररोज लागणारी गोष्ट आहे. म्हणून या क्षेत्राविषयी असलेल्या पूर्वज्ञान आणि त्याची असणारी गरज यामुळेच मी या व्यवसायाकडे वळलो.

अजय: सर्वसामान्यपणे लोकं नोकरीकडे वळतात, तुम्ही भाजीपाला व्यवसायाकडे का वळाले?

भाजीवाला: घरात शेतीतील वातावरण असल्यामुळे त्याला जोड धंदा म्हणून भाजीपाला व्यवसाय करणे हीच माझी पहिली निवड होती.आणि दुसऱ्याकडे नोकरी करण्यापेक्षा आज मी स्वतः चा व्यवसाय करतोय याचा मला अभिमान वाटतो.

अजय: दिवसातुन तुम्ही किती वेळ तुमच्या व्यवसायाला देतात आणि कोण कोणत्या भाज्यांचा समावेश तुम्ही तुमच्या व्यवसायात करतात.

भाजीवाला: दिवसातून आठ ते दहा तास हा सर्व कामांसाठी जातो. भाजीपाला आणणे  आणि विक्री करण्यापर्यंत तेवढा किंवा त्यापेक्षा जास्त वेळ लागतोच. आणि आपल्या कडे उपलब्ध असणाऱ्या जवळपास सर्वच भाज्या मी विकत असतो.

अजय: कोविड सारख्या नैसर्गिक आपत्तीत तुम्ही स्वतःला कसे सावरले व तुमचा अनुभव कसा?

भाजीवाला: कोविड हा संसर्गजन्य रोग असल्यामुळे लोक भाजीपाला घ्यायला यायला ही घाबरायचे पण हळूहळू परिस्थिती सुधारू लागली आणि व्यवसाय पूर्वपदावर आला.

अजय: साधारणत: दिवसाला तुमची किती कमाई होते.

भाजीवाला: खरतर ते प्रत्येक दिवसावर अवलंबून असते, पण तरीही भांडवल काढून हजार रुपये हे नक्की मिळतात.

अजय: दादा, तुमच्या पुढील भविष्यासाठी आणि तुमच्या व्यवसायासाठी आमच्याकडून खूप साऱ्या शुभेच्छा.

भाजीवाला: धन्यवाद!

Similar questions