History, asked by zara2974, 1 year ago


उपक्रम : ‘सुदृढ शरीर' बनवण्यासाठी खालील मुद्यांना अनुसरून माहिती
(१) व्यायाम
(२) सवयी
(३) आहार​

Answers

Answered by halamadrid
410

Answer:

सगळ्यांनाच हवेहवेसे वाटणारे सदृढ आणि निरोगी शरीरामुळे आपण आजारांपासून दूर राहतो, काम उत्साहाने आणि आनंदाने करतो.सदृढ शरीरासाठी व्यायाम,चांगल्या सवयी आणि आहाराचे फार महत्व आहे,जे पुढीलपैकी आहे:

१.व्यायामामुळे तनाव आणि नैराश्य दूर होतो,आपले स्नायु व हाडे मजबूत बनतात, वजन कमी होते,आरोग्य चांगले व मन प्रसन्न राहते.तसेच नियमित व्यायाम केल्याने हृदयरोग,मधुमेह,उच्च रक्तदाब यासारख्या आजारांपासून आपण दूर होतो.

२.नियमित व्यायाम करणे,सकाळी लवकर उठणे,पोषक आहाराचे सेवन करणे,स्वावलंबी बनणे,सकारात्मक विचार करणे, निसर्गाच्या सानिध्यात वेळ घालवणे,धूम्रपान आणि मद्यपान न करणे यासारख्या चांगल्या सवयींमुळे सदृढ शरीर बनवण्यास खूप मदत होते.यामुळे आपण आजारांपासून लांब राहतो,आपल्याला ताजेतवाने व आनंदी वाटते आणि आपली मनस्थिति सुधारते.

३.संतुलित आणि पोषक आहारामुळे आपले शरीर निरोगी व स्वस्थ बनते,आपण आजारांपासून दूर राहतो व आपले वजन नियंत्रणात राहते.आहारातील जीवनसत्वे आणि खनिज पदार्थांमुळे आपली रोग प्रतिकारक शक्ति वाढते.संतुलित आहारामुळे आपल्या शरीराला आवश्यक असलेले सगळे पोषक तत्व मिळतात,ज्यामुळे शरीराची उत्तम वाढ आणि विकास होते.

Explanation:

Answered by praveep9778
7

*This is the answer of the question*

Attachments:
Similar questions