History, asked by kadambarilanjwar, 4 months ago

उपक्रम
तुम्हाला आवडणाऱ्या कोणत्याही एका विषयावर विस्तृत
माहिती मिळवा व त्याचा इतिहास लिहा. उदा.,
* पेन (लेखणी)चा इतिहास
* मुद्रणकलेचा इतिहास
* संगणकाचा इतिहास​

Answers

Answered by ajay9011
19

Explanation:

असे म्हटल्या जाते कि, " गरज शोध कार्याची जननी आहे. " हि म्हण संगणकाच्या बाबतीत सुद्धा लागू होते. आज आपण जो संगणक पाहत आहोत. त्याचा शोध हा लवकरात लवकर आणि बिनचूक गणितीय क्रिया करण्याच्या आवश्यकतेतुन लागला. सुरुवातीपासून ते आता पर्यंत यात अनेक आणि गरजेनुसार बदल करण्यात आले आणि आजचा संगणक तयार झाला.

abacus तुम्हाला माहित आहे का ? इ.स. पूर्व ३००० ते ५००० या कालावधी मध्ये बेरीज, भागाकार, गुणाकार, वजाबाकी, करण्याकरिता चीन, जपान, रोम इ. देशात अबॅकसचा वापर केला जात असे. आज पण एशिया, अफ्रिका, आणि इतर अनेक ठिकाणी अबॅकसचा उपयोग केला जातो. अबॅकस हे यंत्र वरील प्रमाणे दिसत असेे.

१६४२ मध्ये ब्लेस पास्कल याने एक गणक यंत्र तयार केले. पास्कल हा फ्रेंच गणिततज्ज्ञ, भौतिकशास्त्रज्ञ, संशोधक, लेखक, कॅथॉलिक तज्ज्ञ होता. ब्लेस पास्कल याने वडिलांना हिशोबाच्या कामात मदत करण्याच्या उद्देशाने १६४२ मध्ये बेरीज व वजाबाकी करणारे एक यंत्र तयार केले. हे यंत्र तयार करण्याचा व त्याचे वितरण करण्याचा अधिकार ब्लेस पास्कल यांना १६४९ मध्ये देण्यात आला. प्रामुख्याने आकडेमोडीसाठी त्याचा वापर होत असे. परंतु या यंत्रावर गुणाकार व भागाकार करता येत नसत. तसेच ते महाग व क्लिष्ट असल्याने त्याचा फारसा प्रसार झाला नाही. १६७१ मध्ये गणिततज्ज्ञ गॉट फ्रिडने पास्कलच्या यंत्रात बरेच फेरबदल करून बेरीज, वजाबाकी सोबतच गुणाकार, भागाकार व इतरही काही गणितीय क्रिया करता येतील असे यंत्र तयार केले.

जॉन नेपियर या गणिततज्ज्ञाने १७ व्या शतकात गुणाकार व भागाकार करण्याकरिता लॉगॉरिथमचा शोध लावला. याच्या सहाय्याने गुणाकार व भागाकार ह्या क्रिया जलद गतीने करणे शक्य झाले.

चार्लस बॅबेज ज्यांना गणिततज्ज्ञ संबोधिले जाते. चार्लस बॅबेज केंब्रिज विद्यापीठात नोकरीला होते. त्यांनी १८३० मध्ये एक नवीन यंत्र शोधून काढले, त्याच यंत्राला DifferentialEngine असे म्हटल्या जाते. या यंत्राचा वापर आकडेमोड करण्याकरिता केला जात असे, तसेच बीजगणिते सुद्धा सोडविता येत असत. या यंत्राचा उपयोग करून वीस दशांश चिन्हा पर्यंत उत्तरे मिळत असत. आणि याच यंत्राचा उपयोग करता करता चार्लस बॅबेज यांनी AnalyticalEngine तयार केले. या यंत्राचा बाह्य आराखडा हा आजच्या आधुनिक संगणकाशी थोडाफार मिळता जुळता होता. Analytical Engine यंत्राचे मुख्य पाच भाग होते. त्यापैकी पहिल्या भागात माहिती साठविली जात असे, दुसऱ्या भागात आकडेमोड केली जावून तिसऱ्या भागात माहिती स्वीकारणे आणि चौथ्या भागात उत्तरे दाखविणे व पाचव्या भाग हा चारही भागांवर नियंत्रण ठेवण्याचे कार्य करीत असे. चार्लस बॅबेज यांनी तयार केलेले Analytical Engine हाच आधुनिक संगणकाचा पाया आहे. असे म्हटले किंवा समजले जाते आणि त्यामुळेच चार्लस बॅबेज यांना ' संगणकाचा जनक ' असे म्हणतात.

Answered by umeshshinde14
8

संगणक एक असे डिव्हाइस आहे ज्यास संगणक प्रोग्रामिंगद्वारे अंकगणित किंवा लॉजिकल ऑपरेशन्सचा क्रम आपोआप पूर्ण करण्याची सूचना दिली जाऊ शकते. आधुनिक संगणकांमध्ये ऑपरेशन्सच्या सामान्यीकृत संचाचे अनुसरण करण्याची क्षमता असते, ज्यास प्रोग्राम म्हणतात. हे प्रोग्राम्स संगणकांना अत्यधिक तपशीलवार कार्ये करण्यास सक्षम करतात. संगणक विविध औद्योगिक क्षेत्रात आणि ग्राहक उपकरणांसाठी नियंत्रण प्रणाली म्हणून वापरले जातात. यात मायक्रोवेव्ह ओव्हन आणि रिमोट कंट्रोल, फॅक्टरी उपकरणे जसे की औद्योगिक रोबोट्स आणि संगणक सहाय्यित डिझाइन सारखी सामान्य विशेष उद्देश साधने आणि वैयक्तिक संगणक आणि स्मार्टफोन सारख्या मोबाइल डिव्हाइससारख्या सामान्य हेतूची साधने समाविष्ट आहेत.

संगणकाचा इतिहास

19 व्या शतकात ‘चार्ल्स बॅबेज’ या गणिताच्या प्राध्यापकाने संगणकाचा शोध लावला. त्याने विश्लेषणात्मक इंजिन तयार केले आहे, त्या आधारावर आजचे संगणक देखील कार्यरत आहेत. आजच्या संगणकांमध्ये देखील ते Analytical Engine वापरलं जात. सामान्यत: संगणकाचे तीन पिढ्यांमध्ये वर्गीकरण केले जाऊ शकते. प्रत्येक पिढी ठराविक काळासाठी टिकली आणि पिढ्यांसह आपले संगणक वाढत राहिले म्हणजेच काळानुसार संगणकांमध्ये देखील बदल घडू लागले आणि तुम्हाला आणखी चांगले नवीन फीचर्स सह संगणक मिळू लागले. त्या प्रत्येक पिढी विषयी सविस्तर माहिती तुम्हाला खाली दिली आहे ज्यावरून तुम्ही संगणकाचा संपूर्ण इतिहास समजू शकता.

संगणकाची पहिली पिढी ( First Generation Of Computer In Marathi )

आधारीत – Vaccum Tubes

वर्ष – १९४०-१९५६

या पिढीच्या संगणकांद्वारे इलेक्ट्रॉनिक सिग्नल नियंत्रित आणि प्रसारित करण्यासाठी व्हॅकम ट्यूबचा वापर केला गेला. आपण कल्पना देखील करू शकत नाही कि संगणक बनवताना या गोष्टींचा वापर केला असेल चुकीं ने सगळ्यात आधी संगणकाचे स्वप्न साकार केले म्हणून त्या वेळेस खूप साऱ्या संगणकाचं निर्माण करण्यात आलं या पिढीमध्ये संगणकामध्ये जी Vaccum Tube वापरली जायची तिचा आकार हा खूप मोठा असायचा त्यामुळे त्या Vaccum Tube ला जागा खूप लागायची म्हणून त्या काळातले संगणक हे एवढे मोठे असायचे. त्या काळाचे संगणक तर मोठे होतेच परंतु या सह ते संगणक खूप उष्णता देखील निर्माण करत होते त्या मध्ये Vaccum Tube चा वापर केला असल्यामुळे तुटायची शक्यता खूप जास्त असायची त्याचसोबत याची काम करण्याची क्षमता देखील खूप कमी होती.

या पिढी मध्ये बनवलेले संगणक म्हणजे Electronic Numerical Integrator And Computer (ENIAC), EDSAC (Electronic Delay Storage Automatic Computer), UNIVAC (Universal Automatic Computer) इत्यादी आहेत.

संगणकाची दुसरी पिढी ( Second Generation Of Computer In Marathi )

वर्ष – १९५६-१९६३

मित्रांनो संगणकाच्या दुसर्‍या पिढीमध्ये ट्रान्झिस्टरचा शोध लागला होता हा शोध त्या काळी खूप महत्वाचा आहे आणि आता तो संगणकांमध्ये वापरला जाऊ लागला. हे ट्रान्झिस्टर Vaccum Tube पेक्षा अधिक कार्यक्षम होते आणि त्यांचे आकार देखील त्यांच्यापेक्षा खूपच लहान होते. त्या काळात जेव्हा ट्रान्झिस्टर चा वापर संगणकामध्ये करण्यात आला तेव्हा संगणकाचा आकार हा खूप लहान झाला आणि त्याची फुटण्याची तक्रार देखील नाहीशी झाली ट्रान्झिस्टर हा Vaccum Tube पेक्षा अधिक जास्त उपयुक्त होता त्याची क्षमता अधिक होती आणि आता संगणकाने वेगवान काम करणे सुरु केले. ट्रान्झिस्टर चा वापर केल्यामुळे संगणकाचा काम करण्याचा वेग हा खूप वाढला. आता संगणक पहिल्या पिढ्यापेक्षा लहान होऊ लागले आणि वेगवान काम करू लागले.

संगणकाची तिसरी पिढी ( Third Generation Of Computer In Marathi )

आधारीत – Integrated Circuit

वर्ष – १९६३-१९७१

पहिल्या आणि दुसऱ्या पिढीपेक्षा हे संगणक अतिशय लाभदायक होते ट्रान्झिस्टरपेक्षा खूपच लहान असलेल्या या पिढीच्या संगणकामध्ये इंटिग्रेटेड सर्किट्स वापरणे सुरू झाले. हे ट्रान्झिस्टरपेक्षा हि खूपच लहान होते आणि याची काम करण्याची क्षमता देखील खूप जलद होती या पिढीच्या संगणकांची क्षमता मोठ्या प्रमाणात वाढली होती आणि आता बर्‍याच संगणक एकाच वेळी वापरता येतील अशी सुविधा देखील उपलब्ध करण्यात आली होती. यामध्ये, सिलिकॉन चिपने बनविलेले एक छोटे इंटिग्रेटेड सर्किट वापरले गेले होते, त्यामुळे त्याचा आकार आता खूपच लहान झाला होता. हे असं संगणक होत जे सामान्य लोक देखील वापरू लागले म्हणजेच या संगणकाचा वापर घरात देखील सुरु झाला.

संगणकाची चौथी पिढी ( Fourth Generation Of Computer In Marathi )

आधारीत – Microprocessor

वर्ष – १९७१- आता पर्यंत

आजच्या काळात आपण जास्त प्रमाणात याच पिढीच्या संगणकाचा वापर करतो तुम्हा सर्वांना लॅपटॉप तर माहितीच असेल लॅपटॉपच निर्माण देखील याच पिढीत करण्यात आलं आहे लॅपटॉप का आपण कुठे पण जाताना सोबत नेऊ शकतो. या पिढीमध्ये बनवण्यात आलेल्या संगणकाचा आकार हा मागील दोन्ही पिढ्यांपेक्षा खूप छोटा आहे ज्याला आपण आपल्या सोबत कुठे पण घेऊन जाऊ शकतो. या प्रकारच्या संगणकात व्हीएसएलआयच्या (VSLI मदतीने हजारो ट्रान्झिस्टर एकत्र जोडले जाऊ शकतात आणि त्याची गती मोठ्या प्रमाणात वाढविली जाऊ शकते. आता आपण सर्वजण या पिढीचे संगणकही वैयक्तिक संगणक म्हणून वापरू लागलो आहोत. ही पिढी संगणक क्षेत्रातली सर्वात मोठी क्रांती मानली जाते.

Similar questions