India Languages, asked by bhargavi9335, 1 year ago

उपमेय व उपमान अलंकार सांगा

Answers

Answered by fistshelter
31

Answer:अलंकार म्हणजे भूषणे, दागिने. शरीर शोभायमान दिसण्यासाठी अंगावर दागिने घालतात. शरीराची शोभा दागिने अधिक खुलवतात. आपली भाषा सुंदर व्हावी, म्हणून भाषेतही भूषणांचा, अलंकारांचा उपयोग कवि आणि लेखक करत असतात. विशेषत: पद्यात अलंकार अधिक शोभून दिसतात. गद्यसुद्धा अलंकारांनी सुंदर दिसते. ‘मुख सुंदर दिसते’ किंवा ‘मुख सुंदर आहे’ ही साधी (गद्य) वाक्ये झाली; ‘परंतु ‘मुख कमलासारखे सुंदर आहे’ किंवा ‘मुख जणू कमलच आहे’ असे म्हटले तर ते अधिक सुंदर दिसते. यालाच अलंकारिक भाषा म्हणतात.

दोन सुंदर वस्तूंमधील साम्य दर्शवून पद्यामध्ये अर्थचमत्कृती आणली जाते. तेथे अर्थालंकार होतो. बहुतेक अर्थालंकार अशा साम्यावर आधारित असतात. त्यात चार गोष्टी महत्वाच्या असतात.

*ज्या गोष्टीचे वर्णन कवी करत असतो, तिला अलंकारात ‘उपमेय’ असे म्हणतात. ‘मुख कमलासारखे सुंदर आहे’ या वाक्यामध्ये मुखाचे वर्णन कवी करत आहे, म्हणून ‘मुख’ हे ‘उपमेय’ आहे.

*उपमेयाचे साम्य ज्या दुसऱ्या गोष्टीशी कवी दाखवतात, तिला ‘उपमान’ असे म्हणतात. वरील वाक्यात मुखाचे साम्य कमलाशी दाखवले आहे, म्हणून ‘कमल’ हे तेथे ‘उपमान’ आहे.

Explanation:

Similar questions