CBSE BOARD XII, asked by sonwanev135, 1 month ago

'उपद्रव देणे' या वाक्यप्रचाराचा वाक्यात उपयोग करा.​

Answers

Answered by indhusengottuvel
1

Explanation:

शब्दशः होणा-या अर्थापेक्षा भिन्न व विशिष्ट अर्थाने रूढ होऊन बसलेल्या शब्दसमूहाला वाक्यप्रचार असे म्हणतात. यालाच कोणी वाक्संप्रदाय असेही म्हणतात. 

मूळ अर्थापेक्षा भिन्न अशा विशिष्ठ अर्थाने रूढ झालेल्या शब्दसमूहाला 'वाक्प्रचार' असे म्हणतात.

हे वाक्यप्रचार म्हणजे वाक्यांश असतो, ते पूर्ण वाक्य नसते.

अवलंब करणे - स्वीकार करणे, आधार घेणे.

अकांड तांडव करणे (आकांड तांडव करणे) - रागाने आदळआपट करणे.

अंग चोरणे - अंग रारवून काम करणे.

अंग टाकणे - शरीराने कृश होणे, रोडावणे.

अक्कल पुढे करणे - बुद्धीचा भलताच उपयोग करणे.

अंगावर शेकणे - मोठी हानी शिक्षा म्हणून भोगावी लागणे, हानिकारक होणे.

अंगाचा तीळपापड होणे - अतिशय संताप येणे.

अंगाची लाही लाही होणे - क्रोधाने क्षुब्ध होणे, मनाचा जळफळाट होणे.

अंगावर मूठभर मांस चढणे - धन्यता वाटणे.

अंगावर रोमांच उभे राहणे (अंगावर काटा उभा राहणे) -भीतीने किंवा आनंदाने अंगावर शहारे येणे.

अग्निदिव्य करणे - कठीण कसोटीतून पार पडणे, प्राणांतिक संकटातून जाणे.

अंगवळणी पडणे - सवय होणे.

अंगावर मास नसणे - कृश होणे, प्रकृती खालावणे, खूप थकणे.

अंग शहारून टाकणे - अंगावर रोमांच उभे राहणे.

अंग चोरून बसणे (अंग मारून बसणे) - अवघडून बसणे.

अंगीकारणे - स्वीकारणे.

अंगाचा खुर्दा होणे - शरीराला त्रास होणे.

अंगावर घेणे - एखाद्या गोष्टीचा स्वीकार करणे.

अंगाचे पाणी पाणी होणे - घाम येणे.

अंग मोडून काम करणे - खूप मेहनत करणे.

अंग काढून घेणे (अंग काढणे) - अलिप्त राहणे, संबंध तोडणे.

अंगाचा भडका उडणे - क्रोधामुळे अंगाची आग आग होणे.

अंतर देणे - सोडून देणे, त्याग करणे.

अंग झाडून मोकळे होणे - संबंध तोडणे.

अंगात त्राण नसणे - अंगातील शक्ती नाहीशी होणे.

अंगाने चांगला आडवा असणे - सशक्त असणे.

अंगात कापरे सुटणे - भीतीने थरथरणे.

अंगावर धावून येणे - मारावयास येणे.

अंगावर तुटून पडणे - जोराचा हल्ला करणे.

अटकेपार झेंडा लावणे - फार मोठा पराक्रम गाजविणे.

अटीतटीने खेळणे - चुरशीने खेळणे.

अठरा विश्वे दारिद्र्य असणे - अतिशय गरिबी असणे.

अडकित्त्यात सापडणे - पेचात सापडणे, मोठ्या अडचणीत सापडणे.

अडचणींचा डोंगर असणे - अनेक अडचणी येणे.

अवाक्षर न काढणे - एकही अक्षर न बोलणे.

अंतःकरण भरून येणे - हृदयात भावना दाटून येणे, भावनानी गहिवरून येणे.

अनुमती विचारणे - परवानगी मागणे.

अंतःकरणाला पाझर फुटणे (अंतःकरण विरघळणे) - दया येणे.

अंतःकरण तीळतीळ तुटणे - अतिशय वाईट वाटणे.

अंतःकरण विदीर्ण होणे - अतिशय दुःख होणे.

अंतःकरणाचा कोठा साफ असणे - मन स्वच्छ असणे.

अंतरीचा तळीराम गार होणे - इच्छा तृप्त होणे.

अंतर्मुख होणे - खोलवर विचार करणे.

अंतर्धान पावणे - नाहीसे होणे.

अंकित राहणे - गुलाम होणे, वश होणे.

अंत पाहणे - अखेरची मर्यादा येईपर्यंत थांबणे.

अंथरूण पाहून पाय पसरणे - ऐपतीच्या मानाने खर्च करणे.

अत्तराचे दिवे जाळणे - भरपूर उधळपट्टी करणे.

अद्वा तद्वा बोलणे - एखाद्याच्या मनाला लागेल असे बोलणे.

अन्नास जागणे - उपकार स्मरणे, उपकाराची जाणीव ठेवणे.

अनर्थ गुदरणे (ओढवणे) - भयंकर संकट येणे.

अनावर होणे - भावविवश होणे.

अन्नास मोताद होणे - उपासमार होणे, अन्न मिळण्यास कठीण होणे.

अवगत असणे - ठाऊक असणे.

अन्नावर तुटून पडणे - खूप भूक लागल्याने भराभर जेवणे.

अन्नास लावणे - उपजीविकेचे साधन मिळवून देणे.

अदृश्य होणे - लुप्त होणे, नाहीसे होणे.

अनुमताने चालणे - संमतीने वागणे.

अर्ध्या हळकुंडाने पिवळे होणे - थोड्याशा यशानेच गर्व करणे.

अवदसा आठवणे - वाईट बुद्धी सुचणे.

अवगत होणे - प्राप्त होणे.

अवहेलना करणे - दुर्लक्ष करणे, अपमान करणे.

अवाक् होणे - स्तब्ध होणे.

अळम टळम करणे - टाळाटाळ करणे.

अपराध पोटात घालणे - क्षमा करणे.

अपाय करणे - नुकसान करणे.

अभंग राहणे - भंग न होणे.

अंमल बनावणी करणे - अंमलात आणणे.

अभय देणे - सुरक्षितपणाची हमी देणे.

अभिवादन करणे - वंदन करणे.

अर्पण करणे - वाहणे.

अवसान चढणे - स्फुरण चढणे.

अनुग्रह करणे - उपकार करणे, कृपा करणे.

अधःपात होणे - विनाश होणे.

अवलोकन करणे - निरीक्षण करणे, पाहणे.

अवकळा येणे - वाईट अवस्था येणे.

अडकित्यात धरणे - अडचणीत टाकणे.

अद्दल घडणे - शिक्षा मिळणे.

अक्षत देणे - बोलावणे.

अक्षता पडणे - विवाह उरकणे.

अन्न अन्न करणे - अन्नासाठी फिरणे.

अवतार संपणे - मारणे, स्थित्यंतर होणे.

अळवावरचे पाणी - क्षणभंगूर.

अमर होणे - कायमची कीर्ती प्राप्त होणे.

अनिमिषपणे पाहणे - टक लावून पाहणे.

अस्वस्थता शिगेला जाणे - अस्वस्थता पराकोटीला पोहोचणे.

अग्निदिव्य करणे - प्राणांतिक संकटातून जाणे.

अति परिचयात अवज्ञा - एखाद्याच्या घरी सतत जाण्याने आपले महत्त्व कमी होणे.

अरेरावी करणे - मग्रुरीने वागणे.

अव्हेर करणे - दूर लोटणे.

अनुलक्षून असणे - एखाद्याला उद्देशून असणे.

अगतिक होणे - उपाय न चालणे, निरुपाय होणे.

अतिप्रसंग करणे - अयोग्य वर्तन करणे.

अति तेथे माती होणे - कोणत्याही गोष्टीचा अतिरेक वाईट होणे.

Similar questions