उष्ण प्रवाहाची निर्मिती कोणत्या प्रदेशात झाली आहे?
Answers
Answer:
मासेमारी हा जगात सर्वत्र केला जाणारा एक महत्त्वाचा प्राथमिक व्यवसाय आहे. जगातील बहुतांशी सर्व देश या व्यवसायात कार्यरत असून, हा व्यवसाय प्रामुख्याने किनारपट्टीच्या प्रदेशात केला जातो. पॅसिफिक महासागराची पश्चिम, वायव्य, ईशान्य व पूर्व किनारपट्टी तसेच अटलांटिक महासागराची वायव्य व ईशान्य किनारपट्टी हे प्रदेश मासेमारीसाठी विशेष प्रसिद्ध आहेत.
मासेमारी व्यवसायावर भूखंड मंचाची उपलब्धता हा सर्वांत महत्त्वाचा घटक प्रभाव पाडतो. येथे समुद्राची खोली कमी असते, सूर्यकिरणे थेट तळापर्यंत पोहोचतात आणि त्यामुळे प्लवक या माशांच्या खाद्याची निर्मिती भरपूर प्रमाणात होते. त्यामुळेच एकूण माशांची पैदास येथे जास्त प्रमाणात होते. याशिवाय उष्ण आणि शीत सागरी प्रवाहाचे संगमस्थान हादेखील महत्त्वाचा घटक मासेमारी व्यवसायावर प्रभाव पडतो. ज्या ठिकाणी असे दोन प्रवाह एकत्र येतात, तेथे प्लवकांची निर्मिती व माशांची पैदास मोठ्या प्रमाणावर होते. मासेमारीवर तिसरा प्रमुख प्रभाव पाडणारा प्राकृतिक घटक म्हणजे दंतुर किनारे आणि नैसर्गिक बंदरे होत. ज्या देशांना किंवा किनारपट्टीच्या प्रदेशांना दंतुर किनारा लाभला आहे. तेथे अनेक नैसर्गिक बंधाऱ्यांची निर्मिती झाली आहे. उदा., युरोपमधील बहुतांश देश अमेरिकेच्या पूर्व किनारपट्टीवरील न्यू फाउंड लँड बेटाजवळील प्रदेश, जपान, फिलिपिन्स इत्यादी. वनांची उपलब्धता हा नैसर्गिक घटक मासेमारी व्यवसायावर अप्रत्यक्षरीत्या प्रभाव पडतो. ज्या प्रदेशात अशी विपुल वनसंपदा उपलब्ध आहे. तेथे जहाजबांधणी व्यवसायास बळ मिळते आणि त्यामुळे अशा प्रदेशात अप्रत्यक्षरीत्या मासे व्यवसायास प्रोत्साहन मिळते. देशाचे सापेक्ष स्थान हा अजून एक अन्य प्राकृतिक घटक मासेमारी व्यवसायावर प्रभाव पाडतो. ज्या देशांना द्विपीय स्थान किंवा बेटांचे स्थान उपलब्ध आहे, अशा देशांना मासेमारीस मुबलक वाव मिळतो. असाच वाव काही प्रमाणात द्वीपकल्पीय देशांनाही मिळतो. मात्र खंडांतर्गत देशांना किंवा केवळ उष्णकटिबंधीय सागर किनारी उपलब्ध असणाऱ्या देशांना मासेमारीचा व्यवसाय विकसित करण्यात अडथळा येतात