उतारा:
घाटात घाट वरंधा घाट, बाकी सब घाटीयाँ! असे इथे आल्यावर वाटते. पाण्यावर झुकलेल्या
हिरव्यागच्च झाडीतून रोरावत बाहेर येणारे धबधबे, दरीतलं हिरवं रान, ढगाळलेले डोंगर, पावसाची
संततधार, मोठमोठ्या दगडांवर आसूड मारत धावत खळाळत वाहणारे पाणी, असे निसर्गाचे विहंगम दृश्य
डोळ्यांसमोर येते अन् नजरेचे पारणे फेडून जाते. त्या पावसाळी वातावरणात भजी-वडे-चहा असा
चमचमीत मेनू मजबूत चापायला वरंधा घाटातल्या टपऱ्यांसारखी दुसरी जागा नाही. श्री वाघजाईच्या
सोबतीने उभारलेल्या टपऱ्यांमधून हा राजेशाही खाना अगदी ताजा ताजा तयार केला जातो.
कांदाभजी, आलं लसूण घालून तळलेला गरमागरम बटाटेवडा आणि सोबत वाफाळलेला चहा. बाहेर
बरसणाऱ्या पावसाकडे पाहत या गरमागरम मेनूचा आस्वाद घेत रानवाऱ्याचं घोंघावणं ऐकत, विजेचं
लखकन् चमकणं अन् कडाडणं मनाच्या हार्ट डिस्कवर स्टोर करीत कसा वेळ जातो तेच कळत नाही.
गरमागरम
(२)
विहंगम दृश्याची वैशिष्ट्ये
१
-
(३) (i) वचन बदला : (Change the number :)
मटकीशि
धबधबे-
दृश्य-
मशिनल
जाणका (ii) लिंग ओळखा : (Identify the gender :)
जिमाया (१) वीज
(२) घाट
मि (४) राजेशाही खाण्याचे वर्णन तुमच्या शब्दांत करा.
Fi (Describe in own words about the royal feast :)
Answers
Answer:
hi
Explanation:
हे छायाचित्र ओळखा पाहू...
असा प्रश्न विचारला तर प्रत्येक भटक्या (पर्यटकाने) एकदा तरी याचा स्वाद नक्कीच घेतलेला असेल आणि ज्याने कोणी एकदातरी याची चव चाखली असेल तो नक्कीच वारंवार पावसाळ्यात या ठिकाणी जाऊन आला असेल...हे चित्र आहे, आमच्या भोर तालुक्यातील वरंध घाटातील ‘राजेशाही खाना’ असलेल्या गरमागरम कांदाभजी, आलं लसूण घालून तळलेला गरमागरम बटाटेवडा आणि सोबत वाफाळलेला चहाचे..
दरवर्शी या ठिकाणी येणारे पर्यटक मात्र यावर्षी या क्षणांना नक्कीच मिस करीत असतील. कारण करोना संकाटामुळे असलेली टाळेबंदी व निर्बंध यामुळे पर्यटकांना हा अनुभव यावर्षी घेता येणार नाही. पर्यटकांसाठी त्यांच्या या आठवणी ताज्या करण्यासाठी .... इयता आठवीच्या मराठीच्या सुधारीत पाठ्यपुस्तकात पान क्रमांक १३ व १४ वर एक धडा समाविष्ट केलेला 'घाटात घाट वरंधाघाट' या धड्यातील वर्णन देत आहोत. लेखक महेश तेंडुलकर यांच्या ‘भटकंती अनलिमिटेड’ या पुस्तकातून हा धडा घेतला आहे.
पावसाळा सुरू जाला की भटक्यांना (पर्यटकांना) पहिल्यांदा खूनावतो तो आपला वरंद घाट. येथील निसर्ग सौंद्र्या तर पावसाळ्यात खनावतेच मात्र येथील ‘राजेशाही खाना’ म्हणजे गरमागरम कांदाभजी, आलं लसूण घालून तळलेला गरमागरम बटाटेवडा आणि सोबत वाफाळलेला चहा. चापायला वरंधा घाटातल्या टपºयांसारखी दुसरी जागा नाही. श्री वाघजाईच्या सोबतीने उभारलेल्या टपºयांमधून हा राजेशाही खाना अगदी ताजा ताजा तयार केला जातो. बाहेर बरसणाºया पावसाकडे पाहत या गरमागरम मेनूचा आस्वाद घेत रानवाºयाचं घोंघावणं ऐकत, विजेच लखकन चमकणं अन कडाडणं मनाच्या हार्ट डिस्कवर स्टोर करत कसा वेळ जातो तेच कळत नाही.
पुण्याहून महाडकडे जाताना हिरव्या हिरव्या रंगाची झाडे पाहत पाहत, पावसाळ्यातले टिपिकल पावसाळी कुंद वातावरण मजा करत करत प्रवास सुरू असतो. तो बंदिस्त गाडीत सुक्याने करण्यात जितकी मजा असते त्याहीपेक्षा जास्त दोन चाकीवर अंग भिजवत करण्यात असते. पावसाचं पाणी अंगावर घेत आणि रस्त्यावरून येणाºया जाणाºयांच्या अंगावर उडवत, बेफाम वारा छातीवर झेलत, आवडती गाणी गुणगुणत पावसाळी प्रवास करण्यातली मजा तर काही औरच असते. असा शरीर गारठवणारा आणि मनाला उभारी देणारा प्रवास कधी संपूच नये असे वाटते; पण पाहता पाहता मैलांचे दगड मागे पडत जातात आणि आपण येऊन पोहोचतो ते वरंधा घाटात. घाटात घाट वरंधा घाट, बाकी सब घाटीयाँ! असे इथे आल्यावर वाटते.
पाण्यावर झुकलेल्या हिरव्यागच्च झाडीतून रोरावत बाहेर येणारे धबधबे, दरीतलं हिरवं रान, ढगाळलेले डोंगर, पावसाची संततधार, मोठमोठ्या दगडांवर आसूड मारत धावत खळाळत वाहणारे पाणी, असे निसर्गाचे विहंगम दृश्य डोळ्यांसमोर येते अन नजरेचे पारणे फेडून जाते. त्या पावसाळी वातावरणात भजी-वडे-चहा असा चमचमीत मेनू मजबूत चापायला वरंधा घाटातल्या टपºयांसारखी दुसरी जागा नाही. श्री वाघजाईच्या सोबतीने उभारलेल्या टपºयांमधून हा राजेशाही खाना अगदी ताजा ताजा तयार केला जातो. गरमागरम कांदाभजी, आलं लसूण घालून तळलेला गरमागरम बटाटेवडा आणि सोबत वाफाळलेला चहा. बाहेर बरसणाºया पावसाकडे पाहत या गरमागरम मेनूचा आस्वाद घेत रानवाºयाचं घोंघावणं ऐकत, विजेच लखकन चमकणं अन कडाडणं मनाच्या हार्ट डिस्कवर स्टोर करत कसा वेळ जातो तेच कळत नाही. बराच वेळ गेल्यावर थोडंस भिजावसं वाटतं, पाय मोकळे करावेसे वाटतात.