उताऱ्याच्या आधारे दिलेल्या सूचनेनुसार कृती करा.
१)
बाग खांदण्याची दोन अवजारे
२)
उतारातील लेखकाची स्वभाव वैशिष्टे
please tell these answer in marathi
Answers
Answer:
हो उत्तर सांगेन पण उतारा कोठे आहे?
Explanation:
माझी गावची शाळा सोडणार होतो. पुढील शिक्षणासाठी औंध (जि. सातारा) येथील हायस्कूलमध्ये जाण्याचा विचार करत होतो. तसे माझे प्रयत्नही चालू होते. त्यात यश मिळणार याची मला खात्री होती. म्हणूनच मी माझ्या शाळेतील एका शिक्षकाची भेट घेत होतो. त्यांचा सल्ला, मार्गदर्शन मला मिळत होते. श्री. हणमतराव देशमुख हे गावचेच रहिवासी. त्यांनी मला इंग्रजी तर्खडकरांचे भाषांतर शिकवले. ते तसे स्काउटमास्तरही होते. त्यांनी शाळेचे स्काउटपथक पक्क्या पायावर उभे केले होते. श्री. कात्रेमास्तरांनी मला चौथीच्या वर्गात गणित शिकवले. अंकगणितासारखा अवघड विषय त्यांनी सोप्या करून शिकवला. आमचे कात्रे मास्तर अंगाने सडपातळ, दम्याच्या विकाराने त्यांना कधी कधी त्रास व्हायचा. काने मास्तरांच्या घरी माझे वडील लाकडं फोडायला जायचे.
श्री. गोळीवडेकर मास्तर मला मराठी पाचवीत होते. ते इतिहास भूगोल शिकवायचे. त्यात इंग्रजी पहिलीत तर्खडकरांचे पहिले भाषांतर शिकवायचे. श्री. गोळीवडेकर खरे शेतीतज्ज्ञ शिक्षक, शाळेच्या बागा करण्यातच त्यांच अर्ध लक्ष असे. त्यात त्याचा व माझा जवळचा परिचय झाला. त्याच कारण शाळेच्या 'बागा आमच्यासारख्या मुलांच्या जिवावरच तर उभ्या होत. आम्ही मुलं वयानं तसंच हाडा-पिंडाने मोठाड. कष्टाच्या कामाला कणखर. शाळेची गावच्या ओढ्याकाठची बाग ही खरे तर आम्हा मुलांच्या जिवावर चांगली फुललेली, उभी असे. या बागेतल्या विहिरीचं पाणी दोन-दोन तास राहाटेने ओढून, बागेतल्या फुलझाडांना, फळझाडांना आम्ही देत असू. तेव्हा ती फुलझाडं-फळझाडं तरारून उभी राहात होती. त्यामुळे श्री. गोळीवडेकर मास्तर आमच्यावर प्रेम करायचे. बागेतील जमीन कुदळी, टिकावाने खांदावयाची, त्याचे वाफे करायचे, बंध घालायचे अशी सगळी कष्टाची कामे आम्ही मुलं करत असू.
हेडमास्तर श्री. नाईक मास्तर यांचा शाळेत दरारा असे. तसे ते शिस्तीचे कडे भोक्ते. या शिस्तप्रिय हेडमास्तरानी माझ्या शाळेला चांगलीच शिस्त लावली. शाळेची दुसरी घंटा होताच ते हातात छड़ी घेऊन शाळेच्या दारात थाबत. अशा शिस्तीत मग कोण उशीरा येईल! असा त्यांचा दरारा.
श्री. नाईक हे मला इंग्रजी चौथीत इंग्रजी आणि इतिहास शिकवत. त्यात इंग्रजीचे 'रेन-मार्टिन चे ग्रामर ते आवडीने शिकवत. ते सदानकदा विदयार्थ्यांना समुपदेश करत. श्री. रायगावकर मास्तरांसारखे ते कधीही इतर सार्वजनिक कार्यात पडत नसत. आपण बरे अन् आपली शाळा बरी, हेच त्याच कार्य, त्यामुळे त्यांनी शाळेला शिस्त आणली आणि परीक्षेच्या निकालाच्या दृष्टीने त्यांनी शाळेची चांगली प्रगती केली.