उत्तम आरोग्य कसे मिळवता येते ?
Answers
Answer:
१. आहार : दैनंदिन जेवणात स्निग्ध पदार्थ, खनिज या घटक तत्त्वांनी युक्त सकस आणि संतुलित ताजा आहार व्यक्तीला मिळाल्यास आरोग्य चांगले राहते. तुमचा आहार जेवढा चांगला तेवढं तुमचं आरोग्य उत्तम.
. स्वच्छता : आहार घेतांना स्वच्छता बाळगणे खूप महत्त्वाचे आहे. जेवन बनवतांना स्वच्छतेला अधिक प्राधान्य द्यावे. स्वच्छतेमुळे आरोग्याला पोषक स्थिती निर्माण होते. अस्वच्छतेमधून मलेरिया, गॅस्ट्रो यासारखे हानिकारक रोग उदभवतात. वैयक्तिक आणि सार्वजनिक पातळीवर स्वच्छतेची विशेष काळजी घेतली पाहिजे.
. करमणूक : मनोरंजनातून व्यक्तीला आनंद मिळतो. मानसिक स्वास्थ लाभते. सुखी जीवनासाठी नेहमी आनंदी राहणे महत्त्वाचे आहे. मानसिक आरोग्य चांगलं राहण्यासाठी करमणूकीच्या गोष्टी करा.
. व्यायाम : नियमित व्यायाम हा चांगल्या आरोग्याचा दुसरा मंत्र आहे. व्यायाम केल्याने आरोग्याचा दर्जा वाढतो. नियमित व्यायाम केल्याने तुमची रोगप्रतिकार शक्ती वाढते