Social Sciences, asked by varshamargude8805, 6 months ago

उत्तम लक्षण ही कविता कोणत्या ग्रंथांमधून घेतली आहे​

Answers

Answered by vaishnavichavan486
10

Answer:

उत्तम लक्षण ही कविता श्री दासबोध या ग्रंथामधून घेतली आहे

hope its helpful

Explanation:

please mark me as BRAINLIST

and follow me

Answered by dreamrob
0

उत्तम लक्षण ही कविता दासबोध ग्रंथांमधून घेतली आहे

  • श्रीदासबोध या ग्रंथातून घेतलेल्या रचनेत समर्थ रामदास यांनी आदर्श व्यक्तीची लक्षणे सांगितली आहे.व्यक्तीने जीवनात वागताना काय करू नये, हे सांगताना त्याने सत्याच्या मार्गावर चालावे, विवेकपूर्ण वागावे व स्वतःचे कल्याण करावे असा संदेश दिला आहे.
  • श्रोतेहो, तुम्हांला आता मी उत्तम, गुणवान व्यक्तीची लक्षणे सांगतो, ती सावध मनाने ऐकावीत. ही लक्षणे ऐकून तुम्ही सर्व गोष्टी जाणण्याची खूण अंगी बाणवावी.
  • पूर्ण माहिती असल्याशिवाय कुठल्याही रस्त्याने जाऊ नये वाटेमधील अडथळे जाणून घेतल्याशिवाय प्रवास करू नये फळाचे अंतरंग (गुण) ओळखल्याशिवाय ते खाऊ नये रस्त्यात पडलेली वस्तू अचानक पटकन उचलू नये.
  • लोकांनी केलेली विनंती लक्षात घ्यावी तिला अमान्य करू नये पाप किंवा कपट करून मिळवलेल्या संपत्तीचा साठा करू नये. कपट करुन पैसा मिळवू नये पुण्याचा मार्ग म्हणजे सच्छील मार्ग, सद्वर्तन कधीही सोडू नये।
  • जी तोंडाळ, भांडकुदळ व्यक्ती असेल, त्या व्यक्तीशी कधीही भांडू नये व्यर्थ बडबड करणाऱ्या वाचाळ माणसाशी तंटा करू नये सज्जनाची संगत कधी मध्येच सोडू नये, (हे कायम मनात ठेवा.) मनापासून झालेली संतांची मैत्री सोडू नय।
  • स्वत:च्या मनाचा मोठेपणा कधी सोडून देऊ नये. मन कोते करू नये, ते व्यापक ठेवावे. परावलंबी होऊ नये कुणावरी आपल्या आयुष्युयाचे ओझे लादू नये.
  • सत्चा मार्ग कधी सोडू नये. खरेपणाने वागावे. असत्याच्या, खोटेपणाच्या मार्गाने जाऊ नये. खोटारडेपणा करून वागू नये. खोटेपणाचा कधीही वृथा अभिमान,व्यर्थ गर्व करू नये।
  • कधीही अपकीर्ती होऊ देऊ नये, सत्कीर्ती वाढवावी, विवेकाने नेहमी ठामपणे सत्याचीच वाट धरावी.

एई यूके, उत्तम लक्षण ही कविता दासबोध ग्रंथांमधून घेतली आहे

#SPJ3

Similar questions