उत्तम सूत्रसंचालनासाठी आवश्यक असलेली कौशल्ये स्पष्ट करा.
Answers
उत्तम सूत्रसंचालनासाठी आवश्यक असलेले कौशल्य पुढे स्पष्ट केले आहेत.
१. सूत्रसंचालन करण्यासाठी सर्वप्रथम तुमच्यात आत्मविश्वास असला पाहिजे. लोकांची गर्दी बघून तुम्हाला न घाबरता बोलता आलं पाहिजे.
२. उत्तम सूत्रसंचालन करण्यासाठी तुमचे शब्द भांडार मोठे असले पाहिजे.
३. सूत्रसंचालन करण्यासाठी तुमचे शब्द उच्चरण स्पष्ट असणे आवश्यक आहे. तुम्ही काय बोलत आहेत हे ऐकणाऱ्याना समजले पाहिजे. बोलताना तुम्ही न अडखळत बोलायला हवे.
४. उत्तम सूत्रसंचालकाचा आवाज नेहमी ऐकण्यासारखा असतो. म्हणजे तुमचा आवाज कानावर जड नसून ऐकणाऱ्याला प्रसन्न वाटलं पाहिजे.
५. तुम्हाला पाठांतराची सवय असावी. सूत्रसंचालक नेहमी स्क्रिप्ट प्रमाणे बोलतात. त्यासाठी त्यांना सगळं पाठ करावं लागतं.
६. सूत्रसंचालकाने नेहमी प्रेक्षकांना आपलंसं करून सूत्रसंचालन करावं. प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेणे हे सूत्रसंचालकाला जमलं पाहिजे.
Answer:
utam sutrasancalnasathi