Social Sciences, asked by PayalDadhich9033, 10 months ago

उत्तर धृवाचे अक्षांश व रेखांश कसे सांगाल

Answers

Answered by Anonymous
3

Answer:

अक्षांश व रेखांश : भूपृष्ठावरील कोणत्याही बिंदूचे स्थान दर्शविण्यासाठी अक्षवृत्त व रेखावृत्त या दोन वृत्तांचा उपयोग करतात. अक्षवृत्ते पूर्व-पश्चिम कल्पिलेली असून रेखावृत्ते दक्षिणोत्तर कल्पिलेली असतात. पृथ्वीच्या गोल पृष्ठावर दोन्ही ध्रुवांपासून सारख्या अंतरावर कल्पिलेल्या पूर्व-पश्चिम वर्तुळाला ‘विषुववृत्ते’ म्हणतात. या वृत्तामुळे गोल भूपृष्ठाचे दोन समान भाग पडतात. विषुववृत्ताच्या उत्तरेकडील भागाला ‘उत्तर गोलार्ध’ व दक्षिणेकडील भागाला ‘दक्षिण गोलार्ध’ असे म्हणतात. विषुववृत्ताची पातळी भूमध्यातून जाते. विषुववृत्ताला समांतर कल्पिलेल्या वर्तुळांना ‘अक्षवृत्ते’ म्हणतात. एकाच अक्षवृत्तावरील सर्व स्थाने विषुववृत्ताच्या पातळीशी पृथ्वीगोलाच्या मध्यबिंदूजवळ सारखाच कोन करतात. त्या स्थानांचे विषुववृत्ताशी असलेले हे कोनीय अंतर म्हणजे त्यांचे अक्षांश होत.

एकाच अक्षवृत्तावरील सर्व स्थानांचे अक्षांश सारखेच असतात. तेव्हा विषुववृत्ताच्या पातळीशी पृथ्वीगोलाच्या मध्यबिंदूजवळ समान कोनीय अंतर असलेल्या, विषुववृत्ताच्या एकाच बाजूला असणाऱ्या सर्व बिंदूंना जोडणारे पृथ्वीगोलावरील वर्तुळ म्हणजे अक्षवृत्त, असेही म्हणता येईल. विषुववृत्त हे सर्वांत मोठे व मूळ अक्षवृत्त होय. त्यावरील सर्व स्थळांचे अक्षांश ०० असतात. बाकीची अक्षवृत्ते त्याच्या उत्तरेस व दक्षिणेस ध्रुवांकडे लहान लहान होत जातात. उत्तर ध्रुव व दक्षिण ध्रुव ही सर्वांत लहान, बिंदुमात्र अक्षवृत्ते होत. त्यांचे अक्षांश अनुक्रमे ९००उ. व ९०० द. असतात. विषुववृत्ताच्या उत्तरेस उत्तर ध्रुवापर्यंत व दक्षिणेस दक्षिण ध्रुवापर्यंत अनंत अक्षवृत्ते मानता येतील. त्यांवरील स्थळांचे अक्षांश अंश, कला व विकला या मापांत सांगतात. कोणत्याही स्थळाचे अक्षांश सांगताना त्याचे विषुवृत्तापासूनचे कोनीय अंतर व ते दक्षिणेचे की उत्तरेचे, हे सांगावे लागते. उदा., मुंबईचे अक्षांश १८० ५५' उ. आहेत, तर रीओ दे जानेरोचे २२० ५५'द. आहेत.

आ. अ. खगोलीय अक्षांश.

पृथ्वीगोलावरील ज्या वर्तुळाची पातळी गोलमध्यातून जाते त्या वर्तुळाला ‘बृहद्‌वृत्त’ म्हणतात. विषुववृत्त हे एकबृहद्‌वृत्त आहे. बाकीच्या अक्षवृत्तांची पातळी गोलमध्यातून जात नाही. ती बृहद्‌वृत्तापेक्षा लहान असतात. अशा वर्तुळांना ‘लघुवृत्ते’ म्हणतात. दोन्ही ध्रुवांमधून जाणाऱ्या वर्तुळांची पातळीही भूमध्यातून जाते. ती वर्तुळेही बृहद्‌वृत्तच होत. दोन्ही ध्रुवांतून दक्षिणोत्तर जाणाऱ्या अर्धवर्तुळांना ‘रेखावृत्ते’ किंवा ‘याम्योत्तर वृत्ते’ असे म्हणतात. ती अक्षवृत्तांना काटकोनात छेदतात. एका रेखावृत्तावरील सर्व ठिकाणी एकाच वेळी मध्यान्ह होत असल्याने रेखावृत्ताला ‘मध्यान्ह वृत्त’ असेही म्हणतात. लंडनमधील ग्रिनिच वेधशाळेवरून जाणाऱ्या रेखावृत्ताला ‘मूळ रेखावृत्त’ किंवा ‘शून्य रेखावृत्त’ असे म्हणतात. या मूळ रेखावृत्तीची पातळी आणि स्थलरेखावृत्ताची पातळी यांमधील कोनास ‘रेखांश’ असे म्हणतात. मूळ रेखावृत्ताच्या पूर्वेकडे व पश्चिमेकडे रेखांश मोजले जातात. उदा., मुंबईचे रेखांश ७२० ५४' पू. आहेत तर न्यूयॉर्कचे ७४० १' प. आहेत.

आ. आ. भू-केंद्रीय अक्षांश.कोणत्याही स्थळाचे एकूण तीन प्रकारचे अक्षांश आढळतात : ते म्हणजे (१) खगोलीय अक्षांश, (२) भू-केंद्रीय अक्षांश व (३) भौगोलिक अक्षांश.

आकृती अ मध्ये दाखविल्याप्रमाणे विषुववृत्ताची पातळी व त्या स्थळाची ओळंब्याची लंबरेषा यांमधील कोनाला ‘खगोलीय अक्षांश’ असे म्हणतात. आकृती आ मध्ये दाखविल्याप्रमाणे त्या स्थळामधून जाणाऱ्या पृथ्वीच्या त्रिज्येने विषुववृत्ताच्या पातळीशी केलेला कोन म्हणजे भू-केंद्रीय अक्षांश होय. पृथ्वी जर स्थिर असती व तिचा पृष्ठभाग जर संपूर्णपणे गोलाकार

Similar questions