Geography, asked by shanta5182, 15 hours ago

उद्योगाच्या स्थानिकीकरणावर प्राकृतिक घटकांचा होणारा परिणाम स्पष्ट करा.​

Answers

Answered by JanhaviL
2

(१) कच्चा माल: कोणत्याही उदयोंगधंदयाला कच्च्या मालाची आवश्यकता असते. कच्च्या मालाच्या स्वरूपावर उद्योगधंद्यांचे स्थानिकीकरण अवलंबून असते. काही कच्चा माल हा विशिष्ट स्थानी क्षेत्रातून उपलब्ध होतो. अशा कच्च्या मालावर आधारलेले उद्योगधंदे स्थानिक क्षेत्रात स्थापन करावे लागतात. उदा., लोह-पोलाद उदयोगधंदे हे लोखंडाच्या क्षेत्रात आढळून येतात. याला कारण लोहखनिज हा अवजड शिवाय वजन घटणारा कच्चा

माल आहे.

$ज्या उदयोगधंद्याला लागणारा कच्चा माल शुद्ध

स्वरूपाचा असतो, असे उदयोगधंदे बाजारपेठेच्या

ठिकाणीदेखील उभारले असल्याचे आढळून येते.

उदा., कापडगिरण्या पूर्वी मुंबई येथे होत्या.

ज्या उद्योगधंद्यांना अवजड सामान लागते व त्यांचे पक्क्या मालात रूपांतर होताना त्यांच्या वजनात घट होते, असे उदयोग कच्च्या मालाच्या क्षेत्रातच उभारले जातात. उदा., पोलाद उदयोग, सिमेंट उद्योग. नाशवंत कच्च्या मालावर ठरावीक कालावधीत प्रक्रिया होणे जरुरीचे असल्यामुळे, असे उदघोगघंदे च्या मालाच्या क्षेत्रातच उभारले जातात. उदा., दुधावरप्रक्रिया करणारे दुग्धोत्पादक उदयोगधंदे, कृषी मालावर प्रक्रिया करणारे अन्नप्रक्रिया उदयोग, उसावर प्रक्रिया करणारा साखर उद्योग.

(२) सपाट जमीन: उदयोगांना कारखान्यांच्या उभारणीसाठी व विकासास सपाट जमीन आवश्यक असते. यामुळे कच्चा माल यंत्रसामुग्री यांची वाहतूकही सुलभ होते.

(३) ऊर्जा साधने: सर्व उद्योगधंदयांना ऊर्जा साधने आवश्यक असतात. ज्या प्रदेशात स्वस्त व मुबलक ऊर्जा साधने सहजगत्या उपलब्ध होतात, त्या प्रदेशात उद्योगधंदे स्थापन करणे सोयीचे व फायद्याचे ठरते. कोळसा, जलविद्युत शक्ती, खनिजतेल, अणुशक्ती ही प्रमुख ऊर्जा साधने आहेत. काही उद्योगधंदयांना कोळशाची जास्त आवश्यकता असते. लोह-पोलाद उद्योगात कोळशाचा वापर जास्त प्रमाणात केला जातो; म्हणून त्याचे स्थानिकीकरण कोळशाच्या खाणीजवळ होते. उदा., भारतातील दुर्गापूर हे लोह पोलाद निर्मितीचे केंद्र, ओडिशातील अॅल्युमिनियम उत्पादन केंद्र कोळसा क्षेत्रात आहे.

ज्या प्रदेशात कोळसा उपलब्ध नसतो, पण जलविद्युत उपलब्ध असते, अशा प्रदेशात जलविद्युत निर्मितीकेंद्राच्या आसपास उद्योगधंद्यांचे स्थानिकीकरण होते. उदा., मुंबई येथील रासायनिक उद्योगांना खोपोली व कोयना वीज केंद्रातून विजेचा पुरवठा होतो.

(४) हवामान: काही उद्योगांना विशिष्ट प्रकारचे हवामान लागते. उदा., वस्त्रोदयोगाला दमट हवामान,

तर सिमेंट उद्योगाला, कोरडे

हवामान आवश्यक असते. केवळ असे उद्योग विशिष्ट हवामान असलेल्या प्रदेशात स्थायिक झालेले आढळतात. नव्याने आलेले इलेक्ट्रानिक्स व संगणक सॉफ्टवेअर उदयोगही शुद्ध थंड हवेच्या प्रदेशात जास्त वेगाने वाढलेले दिसतात. उदा., बेंगलोर, हैदराबाद, पुणे.

(५) पाणीपुरवठा: उत्पादन प्रक्रियासाठी काही उदयोगांना भरपूर प्रमाणात पाणी लागते. असे उद्योग नदीकिनारी स्थाईक झालेले आढळतात. उदा., लोह पोलाद, कागद निर्मिती.

please mark me as brainlist

Similar questions