Environmental Sciences, asked by swapnalipatil7947, 2 months ago

उद्योगांमुळे पर्यावरणावर कोणकोणते परिणाम होऊ शकतात स्पष्ट करा

Answers

Answered by rs5423693
35

Answer:

उद्योगाची स्थापना करण्यासाठी विभागीय नकाशाचे पुस्तक ः- पर्यावरण व्यवस्थापन साधन -

भारतासारख्या देशांमध्ये औद्योगिक विकास ही एक अत्यावश्यक वाईट गोष्ट आहे. औद्योगिकीकरणाचा परिणाम म्हणून धोकादायक कचरा उत्पन्न होतो आणि त्यामुळे पर्यावरणाचे प्रदुषण उत्पन्न होते त्यामुळे पर्यावरणाला वाढता धोका उत्पन्न झालेला आहे. मानवी वस्त्या, जंगले, पाण्याच्या संस्था आणि हवा या प्रदुषणासाठी जास्त संवेदनशील असतात आणि प्रदुषणामुळे त्यांच्या श्रेणीमध्ये घट होऊ शकते. त्यामुळे या संवेदनशील क्षेत्रांचे संरक्षण करण्यासाठी पर्यावरणाचे नियोजन करणे आवश्यक आहे. सध्याच्या काळात बाहेर सोडण्यात येणार्‍या द्रवाचे / स्त्रावाचे प्रमाण नियंत्रण करणार्‍या संस्थाकडून केले जाते आणि जेथे उद्योग सुरु करावयाचा आहे ती जागा स्वच्छ केली जाते. परंतु यामुळे उद्योग प्रदुषण निर्माण करणार नाही याबाबत खात्री देता येत नाही. तसेच प्रदुषण नियंत्रण करण्यासाठी जी साधने उद्योगांमध्ये वापरली जातात ती प्रदुषण नियंत्रण मंडळाने सुचीत केलेली असतात, अशी साधने सर्व कालावधी मध्ये त्याचे काम करु शकणार नाहीत किंवा त्यांच्या अपेक्षीत क्षमतेच्या स्तरावर काम करु शकणार नाहीत.

Explanation:

उद्योगामुळे पाण्याच्या प्रदुषणामुळे पाण्याच्या कोणत्या संस्थेवर परिणाम होऊ शकेल तसेच त्यातून बाहेर पडणार्‍या स्त्रावामुळे हवेच्या गुणवत्तेवर परिणाम होईल यावर उद्योगाची जागा अवलंबून असते.त्याचा परिणाम म्हणून निसर्गाचे संतुलन बिघडू शकते. या प्रश्नावर भविष्यामध्ये तोडगा काढण्यासाठी एम पी सी बी ने केंद्रीय प्रदुषण नियंत्रण मंडळ आणि जी टी झेड जर्मन टेक्नीकल को ऑपरेशन जर्मनी यांचे बरोबर, राज्यामध्ये र् र् उद्योगांच्या स्थापनेसाठी विभागीय नकाशाचे पुस्तक र् र् तयार करण्यासाठी सहकार्य करार केलेला आहे. आणि याला पर्यावरण व्यवस्थापन क्षमता बांधणी प्रकल्पा अंतर्गत जागतीक बँकेने आर्थिक सहाय्य केले आहे.

Answered by mad210216
45

"उद्योगांमुळे पर्यावरणावर होणारे परिणाम"

Explanation:

  • उद्योगांमध्ये विविध उत्पादने निर्माण करण्यासाठी वेगवेगळे प्रक्रिया वापरल्या जातात, ज्यामुळे पर्यावरणावर नकारात्मक प्रभाव पडतो.
  • उद्योगांमुळे ध्वनि प्रदूषण, भूमि प्रदूषण, वायु प्रदूषण व जल प्रदूषण आणि इतर प्रकारचे प्रदूषण मोठ्या प्रमाणात वाढले आहे.  
  • उद्योग वाढवण्यासाठी जंगलतोड होत आहे. ज्यामुळे वन्यजीवन धोक्यात आले आहे.  पावसाचे प्रमाण कमी झाले आहे. जागतिक तापमानवाढीचे प्रमाण वाढले आहे.
  • पर्यावरणातील नैसर्गिक तालमेल औद्योगिकीकरणामुळे बिघडते जेणेकरून पर्यावरणासोबतच मनुष्य व पशु पक्ष्यांच्या जीवनावर सुद्धा गंभीर परिणाम होतात.
  • उद्योगांमध्ये उपयोगी होणाऱ्या रसायनांमुळे हवामानात बदल होते.
Similar questions