World Languages, asked by gharatsavita1, 9 months ago

v) दुसऱ्याला मदत करण्यातला आनंद ज्या प्रसंगातून मिळू
शकतो, असा प्रसंग लिहा.
in Marathi ​

Answers

Answered by sanikamharav
30

Answer: काही दिवसांपूर्वी मी शाळेत जात असताना बानुच्या नाल्यातून कुत्र्याच्या पिल्ल्या चा आवाज ऐकू आला. मी नाल्यात डोकावले तर एक पिल्लू पाण्यात पडले होते. बाहेर पडण्यासाठी त्यांची धडपड चालू होती. या धडपडीत बहुदा ते थकले असावे. त्यांच्या डोळ्यात कारुण्य दाटले होते. थंडीने कुडकुडत होते. त्याची ती अवस्था पाहून मला फार वाईट वाटले. मी ताबडतोब नाल्यात उतरलो. त्या तिला कडे गेलो. मग त्याला हलकेच उचलून बाहेर ठेवले आणि मी नल्यायातून बाहेर आलो. बाहेर येतात ते पिल्लू पायाशी येवुन चाटू लागले. त्याच्या चेहऱ्यावरील आनंद त्याला पाहून मलाही आनंद झाले.

Explanation:

Answered by tonpevidya01
3

Answer:

बस स्टॉपवर एक म्हातारी स्त्री उभी होती तिला ‘नानावटी’ हॉस्पिटलला जायचे होते. हॉस्पिटलपर्यंत थेट जाणारी बस नव्हती. रिक्षाला देण्यासाठी तिच्याकडे पैसे नव्हते. मी एक रिक्षा थांबवली तिच्या हातात शंभर रुपये दिले. रिक्षावाल्याला तिला नानावटी हॉस्पिटलला सोडायला सांगितले. तिच्या डोळ्यातला कृतज्ञभाव आजही आठवतो.

एकदा रस्त्याने जात असतांना फुटपाथवर संसार असलेल्या ठिकाणी एक बाळ खूप कळवळून रडत होतं. आजूबाजूला कोणी दिसेना. मी त्याच्या जवळ गेले त्याच्या अंगाखाली आणि आजुबाजुला बरंच पाणी साचलेलं होतं. मी हिम्मत केली त्याला तिथून उचलले. त्याच्या ठेवलेल्या वस्तूमधून एक कापड काढून त्याला कोरडं केलं, कापडात गुंडाळून त्याला कोरड्या जागेत ठेवणार तोच त्याची आई आली, मी तिच्या हातात मुलं दिलं आपलं रडणं थांबवून ते बाळ माझ्याकडे अगदी टुकूटुकू बघत होते. मला खूप छान वाटलं.

Explanation:

Similar questions