विभाग-५.उपयोजित लेखन
खालील मुद्यांच्या आधारे कथा तयार करा,
मुद्दे-एक शिंप्याचे दुकान- गावात सर्कस - सर्कशीतला हत्ती- हत्तीची गंमत करणे – सोंडेला सुई टोचणे
वेदनेने कनवबला-धडा शिकविण्याचा ठरवणे - बाणेरडे पाणी सर्व कपड्यावर उडवणे - तात्पर्य .]
Answers
वरदनगर नावाच्या गावात एक वरद नावाचा शिंपी राहत असतो.तो इतरांशी जसा चांगला वागतो तसच त्यांची खोड देखील काढतो.एके दिवशी नगरात एक सर्कस आयोजित करण्यात आले होते. तेव्हा त्या सर्क्सचा एक हत्ती अचानक गायब होतो.आणि सगळे त्याला शोधायला लागतात.पण तो कोठेच सापडत नाही.मग सर्कस चे लोग अस बक्षीस ठेवतात की जो कोणीही त्या हत्तीला शोधेल, त्याला 100 सुवर्ण मोहरा मिळतील.वरद हे ऐकून खुश होतो, तो त्या हत्तीला शोधायला निगतो.त्याला तो हत्ती एका गड्यात पडलेला दिसतो.
त्यांची तबेत बरी नसते,वरद त्याला ठीक करतो व सर्क्सच्या मालकाला सोपवायला जातो.तेव्हा तो हत्ती मालकाकडे जायला नकार देतो.नंतर मालक त्या गोष्टीवर विचार करून त्या हत्तीच्या प्रेमाखतीर त्याला तो वरदला सोपवतो.वरदला ही तो हत्ती खूप आवडतं असतो.
तो त्यांची काळजी घेतो व हत्ती देखील वरदची काळजी घेतो.एके दिवशी वरद हत्तीची खोड काढायची ठरवतो.तो त्याला एकेदिवशी कमळाचे फुल आणायला सांगतो,त्या आधी तो हत्तीला पिन मुदामून टोचतो.तेव्हा हत्तीला खुप वेदना होतात ते हे लक्षात ठेवून ,कमळाचे फुल आणायला जातो.तो कमळाचे फुल आणतो जरूर पण स्वतःच्या सोंडीत तिथे असणाऱ्या दलदलीतील चिखल देखील आणतो.तो ते चिखल वरद च्या तोंडावर मारतो. वरदला आपली चूक कळते व तो हत्तीची माफी मागतो,व पुन्हा अस करणार नाही असे वचन देतो.
तात्पर्य:कोणालाही विनाकारण त्रास देऊ नये.