(विभाग ५- उपयोजित लेखन)
पत्रलेखन:
खालील निवेदन वाचा व त्याखालील कोणतीही एक कृती सोडवा.
शाळेसमोरील कचराकुंडी
विद्यार्थी प्रतिनिधी या नात्याने
कचराकुंडी हटवल्याबद्दल
आरोग्य खात्याचे आभार |
मानणारे पत्र लिहा.
किंवा
कचराकुंडीची नियमित सफाई
व औषध फवारणीची मागणी
करणारे पत्र आरोग्य खात्याला लिहा
Answers
Answer:
correct answer for your question with new format
Answer:
दिनांक:२० जानेवारी २०२२
प्रति,
मान.आरोग्याधिकारी,
महानगरपालिका,
औरंगाबाद -६७
विषय: कचरा कुंडीची नियमित सफाई व फवारणी बाबत
माननीय महोदय,
मी आदर्श विद्यालय, गांधी चौक औरंगाबाद येथील विद्यार्थी आहे. आमच्या शाळेच्या समोर महानगरपालिकेच्या वतीने भलीमोठी कचराकुंडी ठेवण्यात आली आहे. कचराकुंडी ठेवण्यामागे महानगरपालिकेचा जरी खूप चांगला हेतू असला तरी कचराकुंडी ठेवण्याचा हेतू साध्य झालेला दिसत नाही, कारण कचराकुंडी स्वच्छता निर्माण करण्यासाठी ठेवलेली असते.
आमच्या शाळेसमोरील कचराकुंडी ही नेहमी भरलेली असते व त्यामुळे संपूर्ण परिसरात खूप दुर्गंधी पसरते.शाळेच्या परिसरात व वर्ग चालू असताना देखील त्या दुर्गंधीचा सर्वांनाच त्रास होतो.
मी आपणास विनंती करतो की लवकरात लवकर त्या कचराकुंडीचे सफाई करण्यात यावी आणि औषध फवारणी करण्यात यावी, जर तसे केले नाही तर त्याचा त्रास भरपूर विद्यार्थ्यांना होऊ शकतो.
मला आशा आहे की तुम्ही लवकरच याच्यावर काहीतरी कृती करणार।
खुप खुप धन्यवाद!
तुमचा विश्वासू,
अजय पाटील
इयत्ता दहावी