वेबरच्या नोकरशाही विषयक संकल्पनेचे स्पष्टीकरण करा.
Answers
Answer:
(२१ एप्रिल १८६४–१४ जून १९२०). प्रसिद्ध जर्मन समाजशास्त्रज्ञ व अर्थशास्त्रज्ञ. त्यांचा जन्म एरफुर्ट येथे एका सधन व्यापारी कुटुंबात झाला. त्यांचे व डील राजकारणी व विधिज्ञ होते. माक्स वेबर यांनी हायडल्बर्ग विद्यापीठात दोन वर्षे अध्ययन केले व नंतर बर्लिनला कायद्याची पदवी व अर्थशास्त्रात डॉक्टरेट मिळविली. बर्लिन विद्यापीठात १८९३ मध्ये न्यायशास्त्राचे व्याख्याते आणि १८९४ साली फ्रायबुर्ग विद्यापीठात अर्थशास्त्राचे प्राध्यापक म्हणून त्यांची नियुक्ती झाली. पुढे १८९६ मध्ये त्यांची हायडल्बर्ग विद्यापीठात नेमणूक झाली.
१९०० च्या दरम्यान गंभीर व्याधी जडल्याने त्यांना कोणतेही काम करणे शक्य झाले नाही. १९०४ मध्ये ते अमेरिकेस गेले व त्याच वर्षी त्यांनी अर्काइव्ह फॉर सोशल सायन्स अँड वेल्फेअर पॉलिसीचे संपादक म्हणून काम पाहिले. १९०९ पासून त्यानीं आउटलाइन ऑफ सोशल इकॉनॉमिक्स ह्या बहुखंडीय ग्रंथाचे संपादन केले. त्यासाठी त्यांनी इकॉनॉमी अँड सोसायटी व त्याची पुरवणी म्हणून द इकॉनॉमिक एथिक्स ऑफ द वर्ल्ड रिलिजन या ग्रंथाचे लेखन सुरू केले. १९१८ साली व्हिएन्ना विद्यापीठात अभ्यागत प्राध्यापक म्हणून त्यांची नेमणूक झाली. त्यानंतर म्यूनिक विद्यापीठात १९१९ मध्ये ते अर्थशास्त्राचे प्राध्यापक झाले.
माक्स वेबर यांनी समाजशास्त्राचे महत्त्वपूर्ण संशोधन, विश्लेषण व विवेचन केले. त्यांनी अतिशय मौलिक स्वरूपाचे ग्रंथलेखन केले, पण त्यांपैकी त्यांच्या हयातीत फारच थोडे प्रकाशित व भाषांतरित झाले. त्यांचे इंग्रजीत भाषांतरित झालेले काही महत्त्वाचे ग्रंथ पुढीलप्रमाणे : द प्रॉटेस्टंट एथिक अँड द स्पिरिट ऑफ कॅपिटॅलिझम (१९०४-०५, इं.भा. १९३०), द रिलिजन्स ऑफ द ईस्ट सीरिज (१९२०-२१, इं.भा. १९५२-५८). हा ग्रंथ एकूण तीन खंडांत प्रसिद्ध झाला, ते खंड असे :