वाचाल तर वाचाल मराठी कल्पना विस्तार
Answers
⠀⠀⠀⠀⠀⠀⠀⠀⠀ वाचाल तर वाचाल!
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी सर्वच दलित-पीडित, गरीब, अशिक्षित, दीनदुबळ्या जनतेला हा संदेश दिला होता- 'वाचाल तर वाचाल!' माणूस शिकला नाही; अशिक्षित राहिला की, त्याची सगळीकडून फसवणूक होते. जमीनदार, सावकार हे सगळे त्याची पिळवणूक करतात. तो सर्वांचा गुलाम होतो.
अशिक्षित माणूस चुकीच्या कल्पना मनात बाळगतो. त्याचे बाळ आजारी पडले, तर त्याला दृष्ट लागली, नजर लागली, असे तो मानतो. साप-विंचू चावला वा कुठली रोगराई आली, तर योग्य औषधोपचार न करता तो वैदू भगत, गंडा, दोरा असे उपाय करत राहतो.
शिकलेला माणूस आपली योग्य प्रगती करू शकतो. दुसरा कोणीही त्याची पिळवणूक करू शकत नाही. योग्य प्रकारे शिक्षण घेतलेल्या माणसाला योग्य वेतन दयावे लागते. शिकलेले आईवडील आपल्या मुलांना कधीच अशिक्षित ठेवणार नाहीत.ते त्यांचे योग्य संगोपन करतात. आज सारे जग पुढे जात आहे. अशा वेळी आपण मागे राहून चालणार नाही. म्हणून बाबासाहेब सांगतात की, वाचाल (शिक्षण घ्याल) तर वाचाल (टिकून राहाल)!