India Languages, asked by kshirsagarvidya21, 11 months ago

वाचाल तर वाचाल!
प्रगती पुस्तकघर
दुकान क्र. ५, ३०५ आनंदवन, सातारा
सवलत मुदत
१५ जून ते ३० जून
दुकानाच्या सुवर्णमहोत्सवी
वर्षानिमित्त खास आकर्षण !
सर्व प्रकारच्या पुस्तकांवर
१५ % सवलत
वेळ : सकाळी ९ ते रात्री ८
सवलत कालावधीत दुकान सर्व दिवस
उघडे राहील.
जाणकार वाचक या नात्याने
व्यवस्थापकाला स्वत:साठी पुस्तकांची
मागणी करणारे पत्र लिहा.
किंवा
ग्रंथालय प्रमुख या नात्याने पुस्तकघर
व्यवस्थापकाला शाळेसाठी
मागवलेल्या पुस्तकांवर अधिक
सवलत देण्याविषयी विनंती करणारे
पत्र लिहा.​

Answers

Answered by rajraaz85
46

दिनांक :१६ जून,२०२१.

प्रति,

माननीय व्यवस्थापक,

प्रगती पुस्तक घर,

दुकान क्रमांक०५, ३०५, आनंदवन

आनंदवन, सातारा-४१५००१

विषय: पुस्तकांची मागणी बाबत.

माननीय महोदय,

मी कालच तुमच्या दुकानाची बातमी वाचली. सर्वात आगोदर दुकानाच्या सुवर्णमहोत्सवी वर्षानिमित्त आपले हार्दिक अभिनंदन! बातमी वाचून खूप आनंद झाला की तुम्ही तुमच्या सुवर्णमहोत्सव वर्षानिमित्त प्रत्येक पुस्तकावर १५ टक्के सवलत देत आहात. पुस्तकांवर दिलेल्या सवलतीमुळे माझ्यासारख्या वाचकाला अजून जास्त पुस्तकं मागवता येतील.

मला खालील पुस्तकांची आवश्यकता आहे.

१. बटाट्याची चाळ

२. नटसम्राट

३. ययाती

४. अग्निपंख

मी नेहमी तुमच्या दुकानावरून पुस्तकं मागवत असतो आणि ही तर माझ्यासाठी मोठी संधीच ठरली आहे. कृपया पुस्तकांचे बिल पुस्तकांसोबत पाठवणे. वाचकांना ही संधी उपलब्ध करून दिल्याबद्दल खरंच तुमचे धन्यवाद!

तुमचा वाचक,

श्री अ.ब. पाठक

[email protected]

Answered by vedantwankhade598
4

Answer:

Explanationवाचाल तर वाचाल प्रगती पुस्तक घर आनंद वन, सातारा सवलत मुदत 15जुण 30 पत्र लेखन मुद्दे के अनुसार मराठी

Similar questions