वाचाल तर वाचाल याची उद्दिष्ट्यवाचाल तर वाचाल याची उद्दिष्टे काय आहे त
Answers
Explanation:
सर्वसाधारण लोकांची धारणा असते कि वाचन म्हणजे कंटाळवाणी गोष्ट, पण हे साफ चुकीचे आहे. वाचन खूप महत्वाचे आहे, आणि आत्ताच्या जलद गतीने बदलणाऱ्या जगात, वाचनाला पर्याय राहिलाच नाही. ज्याने आपने ज्ञान वेळेनुसार वाढवले नाही तो मागे राहील यात काही दुमत नाही. “वाचाल तर वाचाल” याचा खरा अर्थ समजायचा असेल तर आपणास पहिल्यांदा काही गैरसमज दूर करावे लागतील. सगळ्यात महत्वाचे म्हणजे सर्व साधारण लोक समजतात की वाचन हे शाळा, महाविद्यालयापर्यंत मर्यादित आहे. हे समजण्यासाठी आपल्याला दोन इंग्रजी शब्द समजून घ्यावे लागतील, एडुकेशन (Education) आणि लर्निंग (Learning). तसे दोन्ही शब्द आलटून पालटून वापरले जातात, पण यांत खूप मोठा फरक आहे. एडुकेशन म्हणजे शाळेत, महाविद्यालयात जी एक औपचारिक शिक्षण प्रक्रिया असते, जी एका ठराविक वेळे नंतर थांबते ती. एडुकेशन हे दुसऱ्यांकडून मिळते, म्हणजे शिक्षक, गुरु आदी. त्याच्या परे लर्निंग जन्मापासून मृत्यू पर्यंत चालू राहते.
Answer:
सकाळी घरात वर्तमानपत्र आले की, ते पहिल्यांदा वाचण्यासाठी आम्हा भावंडांची धडपड असते. प्रत्येकाला आपणच ते प्रथम वाचावे असे वाटते. जगाच्या कानाकोपऱ्यांत काय चालले आहे, हे जाणून घेण्याची केवढी ही उत्सुकता ! आपल्याला वाचता आले नसते, तर केवढ्या अगाध ज्ञानाला आपण पारखे झालो असतो! 'वाचाल, तर वाचाल' हे डॉ. आंबेडकरांचे सुवचन किती सार्थ आहे ! वाचनाने आपण बहुश्रुत होतो. वाचन ही जगाकडे पाहण्याची खिडकी आहे.
मुद्रणकलेच्या शोधापूर्वी माणूस लिहीत-वाचत होता; पण ही संधी फारच थोड्या लोकांना उपलब्ध होती. मुद्रणाच्या शोधानंतर मात्र पूर्वीच्या तुलनेत खूपच लोकांना वाचनाची संधी उपलब्ध झाली. त्यामुळे माणसा-माणसाला, समाजा-समाजाला जोडण्याची प्रक्रिया वेगाने होऊ लागली. जग अधिक जवळ येऊ लागले. ज्ञानाची वेगाने देवाणघेवाण होऊ लागली; ज्ञानाचा प्रसार वाढला व त्यात तितक्याच वेगाने भर पडू लागली. अज्ञानाचे पर्वतच्या पर्वत कोसळू लागले. माणसाने एका नव्या युगात प्रवेश केला. हे नवे युग निर्माण झाले होते ते वाचनामुळे ! लेखक स्वतःचे अनुभव लिहीत असतो. त्यामुळे त्याच्या काळातील जीवनाचे प्रतिबिंब त्याच्या पुस्तकात घडलेले असते. आपण शतकांपूर्वीचा ग्रंथ वाचतो, तेव्हा तत्कालीन जीवनाचे दर्शन घेत असतो. आपण वाचनामुळे भूतकाळात डोकावतो, भूतकाळाची वर्तमानाशी सांगड घालतो. जगभरच्या माणसांचे अनुभव वाचल्यावर आपल्या लक्षात येते की, जगभर माणूस अंतर्यामी सारखाच आहे. जात, धर्म, पंथ, देश, प्रांत, भाषा ही सर्व वरवरची टरफले आहेत.
आपण कथा, कादंबऱ्या, नाटके, काव्य वाचतो. त्यामुळे आपले खूप मनोरंजन होते. पण वाचनामुळे तेवढाच फायदा होतो, असे नाही. वाचनामुळे आपल्याला हजारो माणसांच्या जीवनाचे दर्शन घडते. माणसाच्या जगण्याच्या हजारो मार्गांचे दर्शन घडते. मनाला प्रगल्भता येते; व्यक्तिमत्त्व संपन्न होते. त्यामुळे वाचणाऱ्याला उन्नत जीवन जगण्याचे मार्गदर्शन घडते. आयुष्यात अनेक संकटांवर मात करण्याचे सामर्थ्य मिळते.
वाचनामुळे माणसाची विचारशक्ती, कल्पनाशक्ती, संवेदनशक्ती अशा साऱ्या मानसिक शक्तींचा विकास होतो. प्रगल्भ माणूस बनून अत्यंत आनंददायी व उच्च दर्जाचे जीवन जगण्याचे सामर्थ्य आपल्याला वाचनामुळे लाभते.