वैचारिक लेख म्हणजे काय?
Answers
Answered by
12
Answer:
वैचारिक किंवा चिंतनात्मक प्रकारच्या निबंधांमध्ये दिलेल्या विषयावर आपले विचार मांडायचे असतात. दिलेले विषय हे नेहमी अवतीभोवतीच्या परिथिती संदर्भातले असतात. आपल्या आजू-बाजूच्या परिस्थितीमध्ये कोणत्या उणीवा अथवा त्रुटी आहेत, त्या उणिवा निर्माण होण्याची कारणे कोणती आहेत. या त्रुटी कशाप्रकारे कशाप्रकारे दूर करता येतील. या उणीवा दूर करत असताना कोण -कोणत्या अडचणी येऊ शकतात येणाऱ्या अडचणींना कसे सामोरे जाता येईल इत्यादी प्रकारच्या प्रश्नांचे स्पष्टीकरण या प्रकारच्या निबंधामध्ये द्यायचे असते. अशा प्रकारचे स्पष्टीकरण देत असताना, आपण मांडलेला मुद्दा पटवून देण्यासाठी आवश्यक ती उदाहरणे द्यावीत. दिलेल्या विषयाच्या संदर्भामध्ये आपल्याला माहिती असतलेल्या उदाहरणांचा अवश्य समावेश करावा. त्यामुळे निबंध अधिक चांगला बनतो.
Similar questions
Math,
1 month ago
Computer Science,
4 months ago
Math,
4 months ago
Science,
11 months ago
Math,
11 months ago
India Languages,
11 months ago