वैचारीक लेखा
'प्लास्टिक मुक्ती - काळाची गरज या
गरज या विषयावर
तुमचे विचार लिहा
Answers
Answer:
काल पासून एक बातमी न्युज चॅनल च्या ट्विटर वर येत आहे की गुढीपडव्यापासून प्लास्टिक बॅग वर राज्यात बंदी येणार ,खरोखर जर असे होणार असेल तर ते फारच चांगले होईल.
प्लास्टिक ची सर्वात मोठी समस्या म्हणजे विल्हेवाट लावणे, कारण प्लास्टिक हे कुजून जाऊन किंव्हा जाळून नष्ट होत नाही , फारतर प्लास्टिक वर प्रक्रिया करून नवीन वस्तु तयार केली जाऊ शकते ,आणि ही वस्तु ही खराब झाल्यानंतर?,पुन्हा तोच प्रश्न ही वस्तू नष्ट करायची कशी ,म्हणजे ही एक सायकल तयार होते .
यातूनच तयार होते ती प्लास्टिक कचऱ्याची समस्या ,की या कचऱ्याची विल्हेवाट काशी लावायची ,आणि जर विल्हेवाट लावणे शक्य नसेल तर?.
तर सर्वात उत्तम पर्याय म्हणजे प्लास्टिक कचरा तयार न होऊ देने ,आणि यासाठी सर्वात महत्त्वाचे म्हणजे प्लास्टिक वर बंदी .
पण हे खरोखर शक्य आहे का,कारण अश्या प्रकारच्या चर्चा व घोषणा बऱ्याच वेळेस झाल्या आणि गंगेला मिळाल्या .किमान ह्या वेळेस तरी ही घोषणा फक्त घोषणा न राहता कृतीत परिवर्तित व्हावी ही अपेक्षा ,आणि याचे काटेकोर पने अंमलबजावणी व्हावी .
प्लास्टिक बंदी करताना अनेक समस्या निर्माण होतात जसे प्लास्टिक बॅग तयार करणाऱ्या कंपनीत काम करणाऱ्याच्या रोजगारांचे काय ,कंपनी उभी करताना मालकाने केलेला खर्च त्यावरील कर्ज असे अनेकप्रश्न उपस्थित होतात ,
पर्यावरणाचा विचार करता ज्या अडचणी समोर येतील त्या दूर करून ,त्यावर उपाय योजना करून हा प्रश्न सोडवण्यात जर सरकारी यंत्रणेला यश आले तर फार उत्तम होईल, कारण प्लास्टिक चा कचरा व्यवस्थापन ही एक गंभीर स्वरूपाची समस्या आज तयार झालेली आहे आणि त्यावर उपाय हा शोधलाच पाहिजे.
आता समजा की प्लास्टिक पिशवी वर बंदी घालण्यात आली तर यातून नवीन उद्योगाला चालना मिळेल आणि तो म्हणजे कापडी पिशवीचा
कापडी पिशवीची मागणी वाढेल आणि मग ती तयार करण्यासाठी कुशल कामगारांची गरज निर्माण होईल यातून प्लास्टिक कारखाने बंद पडून बेरोजगार झालेल्या मजुर संख्ये इतकेच किंव्हा जास्त रोजगार निर्मिती होईल
त्याच प्रमाणे कापडी पिशवी तयार करण्यासाठी लागणार कच्च माल म्हणजे कापड म्हणजेच कापसाची मागणी वाढेल आणि कापुस उत्पादक शेतकऱ्यांना कापसाला चांगला भाव मिळेल, बंद पडलेल्या कापड गिरण्या पुन्हा सुरू होतील किंवा नवीन कापड गिराव्या सुरू होतील आणि यातून नवीन रोजगाराच्या संधी उपलब्ध होतील
सारांश :जर प्लास्टिक बॅग वर बंदी घालण्यात आली तर एक पर्यावरण रक्षणाचे काम होईल त्याच सोबत नवीन अर्थप्राणाली विकसित होण्यात मदत होईल, यात शेतकरी, मजूर यांना मोठ्या प्रमाणात फायदा होऊ शकतो .त्यामुळे जर प्लास्टिक बॅग वर बंदी घालण्यात आली तर तिचे स्वागत केले पाहिजे आणि ते आपण करूया.