३) वैचारिक लेखन : आगळीवेगळी भ्रमणध्वनीवर आधारलेली शाळा या विषयावर खालील
मुददयांच्या आधारे तुमचे विचार लिहा.
Answers
कोरोना संबंधित मानसिक शोषणाची जाणीव करून घ्या. व्यक्तीला मृत्यू ही आता सांख्यिकी संकल्पना वाटत नाही. तो खरा आहे. त्याचे अस्तित्व इथे आहे. हा विषाणू कोणत्याही क्षणी आपल्या बंदिस्त समुदायात शिरू शकतो आणि आपल्याला आपणच खोकतोय आणि श्वास घ्यायला त्रास होतोय, अशा परिस्थितीत सापडू शकतो. पण त्याचवेळी एक महाविद्यालयीन विद्यार्थ्याला लॅपटॉपवर त्याचे समाजशास्त्राचे प्राध्यापक ‘स्नोबॉल नमुना पद्धती’ आणि सामाजिक संशोधनाची ‘तंत्रे’ शिकवताना आढळतात. हे विवेकशून्य नाही का? किंवा, मध्यमवर्गीय कुटुंबातील बारा वर्षाच्या एका मुलाला टाळेबंदीमुळे एका लहान खोलीत अस्वस्थ आणि गुदमरल्यासारखे वाटत असूनही ‘ऑनलाइन अध्यापन’ पुढे जाणे आवश्यक असल्यामुळे ’त्याला कुटुंबात उपलब्ध असलेला एकमेव स्मार्टफोन वडिलांकडून उधार घ्यावा लागतो. त्यावर त्याचे गणिताचे शिक्षक त्यांना जीवन विरोधी ‘टक्केवारी’ किंवा ‘नफा-तोटा’ ही प्रकरणे पूर्ण करताना दिसतात, हे विवेकशून्य तर आहेच पण असंवेदनशील आहे. ही एक प्रकारची हिंसा आहे.