वैचारिक लेखन
खालील मुद्द्यांच्या आधारे 'स्वच्छ भारत: आजची गरज' या विषयावर निबंध लिहा.
अस्वच्छता:
देशासमोरील मोठी
समस्या
इतर देशांशी तुलना
सध्याची परिस्थिती
हक्क व कर्तव्ये यांची जाणीव
'देश माझा ही भावना
स्वयंशिस्त
Answers
विषय :- स्वच्छ भारत- तुम्ही स्वत:ला व आपल्या सभोवतालील परिसर कसा स्वच्छ ठेऊ शकता ?
या नववर्षाच्या सुरुवातीलाच दिनांक ९ जानेवारी ते २० जानेवारी पर्यंत स्वच्छ भारत अभियानाची जनजागृती होण्यासाठी विकासपिडियाने “विकासपीडिया–निबंध लेखन स्पर्धा २०१५' आयोजित केली होती.
ही स्पर्धा विकासपीडिया या वेबपोर्टलवरील मजकूर लेखक, नोंदणीकृत सदस्य आणि शाळेतील ८वी ते १०वी मधील विद्यार्थी या तीन गटासाठी आयोजित केली होती. या स्पर्धेमध्ये अहमदनगर, सातारा, सांगली, जालना, वर्धा, यवतमाळ, लातूर आणि नवी मुंबई आशा ८ जिल्ह्यामधून शालेय विद्यार्थी / व्यक्तींनी सहभाग नोंदविला.
या स्पर्धेत शालेय गटातून उत्स्फूर्त सहभाग मिळाला. या स्पर्धेमध्ये एकूण ७११ विध्यार्थी सहभागी झाले होते. हे विद्यार्थी अहमदनगर, सातारा, सांगली, जालना, वर्धा, यवतमाळ या 6 जिल्ह्यातील २४ गावे व ३३ शाळेमधील प्रतिनिधी होते.
या पानावर शालेय गट ,विकासपिडिया मजकूर लेखक गट व विकासपिडिया नोंदणी सदस्य या तीनही गटातील प्रथम पारितोषिक विजेत्यांचे निबंध दिले आहेत.
निबंध १ - विकासपिडिया मजकूर लेखक गट
``गांवाचे जरी उत्तम नसलें।तरि देशाचे भविष्य ढासळले
ऎंसे मानावे जान त्याने भले।हृदया माजी।।''
संत तुकडोजी महाराजांनी रचिलेल्या ग्रामगीतेतील पहिल्याच अध्यायातीलही ५० वी ओवी. गाव चांगले असेल तरच देशाचे भविष्यही चांगले होते, असा त्यांचा संदेश. गावच्या विकासा साठी संतानी आपापल्या परिने प्रयत्न केले.त्यातील च संतगाडगेबाबा व तुकडोजी महाराजांचे योगदान महत्वाचे मानले जाते .देव – देवतांच्या पूजेबरोबरच श्रमातून भक्ती करा.गाव चांगले ठेवा .त्यामुळे देशाचे भवितव्य उज्ज्वल होईल, ही शिकवण त्यांनी युवकांना देण्याचा प्रयत्न केला. सदयस्थितीमध्ये ग्रामीण व शहरी भागात अशुद्ध पाणी, अस्वच्छ परिसर व वैयक्तिक स्वच्छते अभावी उदभावणाऱ्या रोगांमुळे पिडीत असलेल्यांची आकडेवारी वाढत आहे, त्यामुळे ज्यांचे आरोग्य मान, पर्यायाने जीवन स्तर उंचावण्यासाठी शासनही प्रयत्नशील आहे . (उदा. संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियान, निर्मल भारत अभियान, पर्यावरण संतुलित समृद्ध ग्राम योजना वगैरे) यामध्ये ग्रामस्थांचा सक्रीय व सातत्यापूर्ण उत्स्फुर्त सहभाग कार्यक्रमात करुन घेण्याची प्रभावी तरतूद कार्यक्रम अंलमबाजवणी करण्यासाठी शासन ही प्रयत्नशील आहे.
घरांची, गावांची, परिसराची व पर्यायाने देशाचीही स्वच्छता न्हावी व सर्वसामान्य जनतेचे आरोग्य मानव पर्यार्याने जीवनमान उंचवावे व त्यायोगे ``स्वच्छतेतून समृध्दीकडे'' हे संकल्पना मूर्तरुपात येणे अपेक्षित आहे. तसेच पर्यावरणाचे संवर्धन, जतन व संरक्षण करुन समृद्ध व संपन्न परिसर, गाव व पर्यायाने देशाची निर्मिती करणेही काळाची गरज असल्याने जल, जमीन, जंगल, हवा, वनस्पती इ. चे योग्य व्यवस्थापन करुन भौतिक सोयी - सुविधांची निर्मिती ``पर्यावरण संतुलन'' ठेऊन केल्यास नागरीकांचे जीवनमान, दर्जा सुधारण्यास मदत होईल, त्यासाठी स्वच्छतेची सवय प्रत्येकांमध्ये खोलवर रुजण्याची नितांत आवश्यकता आहे.
आपण विदेशातील शहरांची स्वच्छता पाहुन त्यांचे गुणगान गातो, मात्र तेथील स्वछता, शिस्त, सौंदर्य, सृष्टी व हिरवळ वाखाणण्याजोगी आहे, ती केवळ तेथे राहणाऱ्या लोकांमुळेच. त्यांच्या स्वच्छतेच्या सवयीमुळेच आहे, हे मात्र आपण विसरतो. आपण आपल्या मनाला, शरीराला, घराला, परिसराला स्वच्छ बनविण्यासाठी पाऊल उचलण्याची नितांत आवश्यकता आहे. आपण आपले घर स्वच्छ ठेवतो. पण आपला परिसर स्वच्छ ठेवत नाही. अस्वच्छतेमुळे होणाऱ्या आजारांमुळे आपले आरोग्य धोक्यात येऊन आपला घामाचा पैसा व वेळ वाया जात आहे. आज सार्वजनिक ठिकाणी बसमध्ये, लोकल, ऑफिस, उदयान, इमारती, रस्त्यांवर, गल्ली बोळांत, आपल्याला अस्वच्छता दिसते. कुठेही थुंकणे, पान खाऊन पिचकारणे, सिगारेट ची थोटके, खाद्य पदार्थांची वेष्टने, कागदाचे तुकडे, तंबाखू, गुटख्याच्या पिचकाऱ्यांनी रंगविलेल्या भिंती दिसतील. आपल्या नदया या सांडपाणी वाहून नेणाऱ्या गटारी बनल्या आहेत. कचऱ्याचे डोंगरच्या डोंगर शहरांमध्ये तयार होत आहेत. किती जाण आपल्या मुलांना स्वच्छते चे महत्व सांगातात ?त्याचे अनुकरण करायला सांगतात ? आणि स्वत: ही त्याचे अनुकरण करतात ?
आपल्या कडे अनेक रोग हे अस्वच्छतेमुळे होतात. त्यामुळे घराची व परिसराची स्वच्छता हे उत्तम आरोग्या चे महत्वाचे अंग आहे.
आपले मन स्वच्छ, तर आपले घर स्वच्छ।
आपले घर स्वच्छ, तर आपला परिसर स्वच्छ।।
या उक्ती प्रमाणे स्वच्छता राखण्याची जबाबदारीही स्वत: पासून सुरु करावी लागेल. त्याच प्रमाणे मी स्वत: ही परिसर स्वच्छ ठेवण्यासाठी आठवडयातून किमान १ तास स्वच्छता करण्याचा संकल्प करुन तसा प्रयत्नही सुरु केलेला आहे. त्याचप्रमाणे मी स्वत: ही घाण करणार नाही व दुसऱ्यालाही घाण करुन देण्याचा प्रयत्नकरीन. सर्व प्रथम मी स्वत: पासून, माझ्या कुटूंबा पासून, माझ्या गल्ली / वस्तीपासून, माझ्या गावा पासून ते कार्यस्थळा पर्यंत या कामास सुरुवात केलेली आहे व पुढे ही करेन. त्याच बरोबर माझे सम विचारी, सहकारी यांच्या तही स्वच्छतेचे महत्त्व पटवून देवून त्यांनाही या कामात सक्रीय सहभागी करुन घेण्यासाठी प्रयत्नशील आहे. मला माहित आहे की, मी व माझ्या प्रमाणेच, असंख्य व्यक्तींनी स्वच्छतेच्या दिशेने टाकलेले पाऊल संपूर्ण भारत देशाला स्वच्छ करण्यासाठी मदत करेल.
गाव ही शरीर।त्यास राखावे नेहमी पवित्र।
त्याने च नांदेल सर्वत्र।आनंदी गावी।।
रामधून पूर्वी गावपूर्ण।व्हावे स्वच्छ, सौंदर्यवान।
कोणाही घरी गलिच्छपणा।न दिसावे।।
स्वत: प्रमाणेच, सभोवतालीचे परिसरही स्वच्छ ठेवण्याची जबाबदारी प्रत्येकानेच अंगी बानावयास हवी
Explanation: