विचार करून उत्तर द्या .
एक व्यापारी असतो
त्याच्या जवळ 3 पोती नारळ असतात
एका पोत्यात 30 नारळ याप्रमाणे 3
पोत्यात 90 नारळ असतात
तो प्रवासासाठी निघालेला असतो त्या
हायवेवर 30 टोलनाके असतात
प्रत्येक नाक्यावर कररूपाने एका
पोत्यासाठी एक नारळ असे 3 पोत्यासाठी 3
नारळ दिल्यानंतर व्यापा-याकडे किती नारळ
शिल्लक राहतील..?
Answers
उत्तर :-
व्यापाऱ्याकडे २५ नारळ शिल्लक राहतील.
स्पष्टीकरण :-
एकूण टोलनाक्यांची संख्या = ३०
व्यापाऱ्याकडील नारळांच्या पोत्यांची संख्या = ३
प्रत्येक पोत्यात ३० प्रमाणे एकूण नारळाची संख्या = ९० नारळ
टोल नाक्यावर कराच्या रूपात देण्यात येणाऱ्या नारळांची संख्या = प्रत्येक पोत्यास १ नारळ
शोधा :-
व्यापाऱ्याकडे शेवटी किती नारळ शिल्लक राहतात ?
एकूण टोलनाके = ३०
>> टोल नाका क्रमांक १ ते १० (नारळ ३ प्रमाणे) = ३० नारळ कराच्या रूपात देण्यात येतील म्हणजेच १ पोते संपले.
>> टोल नाका क्रमांक ११ ते २० (नारळ २ प्रमाणे) = २० नारळ
>> टोल नाका क्रमांक २१ ते २५ (नारळ २ प्रमाणे) = १० नारळ
म्हणजेच २ पोती संपली.
आता
>> टोल नाका क्रमांक २६ ते ३० (नारळ १ प्रमाणे) = ५ नारळ टोल नाक्यावर द्यावी लागतील.
म्हणजेच,
३० + २० + १० + ५ = ६५
६५ नारळ कर रुपात टोलनाक्यावर दिली जातील.
म्हणजेच,
९० - ६५ = २५
२५ नारळ उरतील.
शेवटी व्यापाराकडे २५ नारळ उरतील.
Answer:
25 coconut
Step-by-step explanation:
3 bags = 3 coconuts.
10 tolls = 10 x 3 = 30 coconuts.
now 1 bag of coconuts are over (each bag has 30 coconuts )
Now he has 2 bags with him. So he has to pay 2 coconuts for 2 bags.
15 tolls = 15 x 2 = 30 coconuts.
Again 1 bag is over. Now he has 1 bag of coconuts remaining and 25 tolls passed. Now he has to pay 1 coconut for 1 bag at each toll.
5 tolls remaining = 5 x 1 = 5 coconuts.
Total tolls over = 10 + 15 + 5 = 30
Total coconuts given on tolls = 30 + 30 + 5 = 65
Remaining coconuts = 90 - 65 = 25
Therefore, the answer is 25 coconut