विचार नव्यान
१)
इतिझासाच्या पायाच्या
स्त्रियांच्या स्थानाच्या विचार
होणे आवश्यक होते.
Answers
Answered by
3
Explanation:
पहिल्या भागात क्रांतिकारी स्त्रियांच्या संदर्भातील लेखांचा समावेश आहे. त्यात येसूबाई सावरकर यांनी थेट चळवळीत सहभाग न घेताही पार पाडलेल्या कामगिरीचं चित्र उत्तरा सहस्रबुद्धे यांनी मांडलं आहे. कल्पना दत्त, अरुणा असफअली, कॅप्टन लक्ष्मी सहगल यांची कामगिरी कौतुकास्पद खरीच पण चाफेकर बंधूंच्या बायकांची कहाणीही त्यांच्या वेदना समोर मांडणारी आहे. चाफेकर बंधूंच्या फाशीनंतर या स्त्रियांचे हाल झाले. चार भिंतींआड राहिलेली या स्त्रियांची वेदना चटका लावून जाते. महात्मा गांधींच्या प्रेरणेने स्त्रिया स्वातंत्र्याच्या लढ्यात उतरल्या. सूतकताई, स्वदेशीचा पुरस्कार, परदेशी मालाची होळी, मिठाचा सत्याग्रह असे लढ्याचे वेगवेगळे मार्ग त्यावेळी हाताळले गेले. त्यात स्त्रिया मोठ्या संख्येने सामील होत्या. मणिबेन नानावटी, मृदुला साराभाई, मणिबेन कारा, कमलाबेन पटेल, अवंतिकाबाई गोखले अशा अनेकजणींबद्दलचे या पुस्तकातले लेख त्यांच्या कामगिरीचा सखोल वेध घेणारे आहेत. ब्रिटिशांशी जिद्दीने लढणा-या आणि वेगवेगळ्या स्तरांवरील क्रांतिकार्यात भाग घेणा-या या सा-या स्त्रियांची कामगिरी मोलाची ती यात शंकाच नाही. तर पेरिन कॅप्टन, तैयबजी कुटुंबातील स्त्रिया, मिठूबेन पेटिट, खिलाफत चळवळीतील महिला, दलित स्त्रिया अशा अल्पसंख्याक गटांमधील स्त्रायंच्या सहभागाचं मूल्यमापन करणारे लेख महत्त्वाची माहिती पुरवतात.
Similar questions