वंचित राहणे वाक्प्रचार अर्थ सांगून ते वाक्यात उपयोग करा
Answers
Answer:
एखादी गोष्ट न मिळणे
Explanation:
वाक्य - जीवनावश्यक वस्तूंपासून आदिवासी समाजा हा वंचित राहतो
Answer:
वंचित राहणे म्हणजे एखाद्या गोष्टीच्या मिळणाऱ्या फायदा पासून वेगळे राहणे. किंवा त्या गोष्टीचा फायदा न मिळणे.
Explanation:
उदाहरणार्थ-
१. खेड्यातील अनेक मुलं शिक्षणापासून वंचित राहतात.
२. स्वातंत्र्यापूर्वी भारत जात, धर्म, पंथां मध्ये विभागला गेल्यामुळे काही जाती धर्मातील लोक अनेक मूलभूत गरजांपासूनही वंचित राहत होते.
३. अजय चे आई वडील लहानपणीच गेल्यामुळे तो आई वडिलांच्या प्रेमापासून वंचित राहिला.
४. अनेक गरीब लोकांना अजूनही स्वतःच्या घरांपासून वंचित राहावं लागतं.
५. अनेक विद्यार्थ्यांना गावात इंटरनेट पोहोचत नसल्यामुळे नवनवीन गोष्टींपासून वंचित राहावे लागते.
वरील वाक्यांवरून असे लक्षात येते की, ज्या वेळेस एखाद्या गटाला किंवा व्यक्तीला एखाद्या गोष्टीचा फायदा मिळत नाही त्यावेळेस त्या गोष्टींपासून तो व्यक्ती वंचित राहिला असे म्हणता येईल.