India Languages, asked by mouhp1, 2 months ago

वाचनाचे महत्त्व 15 - 20 ओळीत निबंध लिहा ​

Answers

Answered by janu491
8

Answer:

वाचनाचे महत्व आपण आपल्या शालेय जीवनापासून ऐकत आलोय. प्रत्येकजण आपल्याला वाचन किती महत्वाच आहे हे सांगत असतो. परंतु आपण खरचं वाचन करतो का? वाचायला आवडते का? वाचून काही फायदा होतो का? लोक वाचनाला एवढे महत्व का देतात? वाचनाने माणूस सुसंस्कृत होतो.

डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असे म्हणतात की, “वाचाल तर वाचाल”. हे खरेच आहे.

माणूस आपले वाचन समृद्ध करून आपला विकास साधू शकतो.

वाचनामुळे मेंदुला चालना मिळते नवनवीन शब्दांमुळे त्याच्यात प्रगती होत असते. वाचनामुळे आपल्याला नवनवीन माहीती मिळतेच तसेच ज्ञानात भर पडते.

वाचनाने शब्द संपत्ती वाढते. त्याचा उपयोग तो निबंध, वकृत्व, लेखन यामध्ये करू शकतो.

लेखकांच्या कथा, कादंबरी, ललितलेख, कविता या विषयी माहिती मिळते. आपले सामान्य ज्ञान वाढते.

त्याचा उपयोग त्याला भावी जीवनात होऊ शकतो.

आपल्याला जर वाचनाची आवड असेल तर मित्रमंडळी किंवा लोकांमध्ये वावरताना आपण एखाद्या विषयावरील चर्चेत आपले मुद्दे योग्य प्रकारे मांडू शकतो. त्यामुळे त्यांच्यात मिसळण्यात मदत होते. वाचनामुळे आपण आपली मते ठळकपणे मांडू शकतो.

शिक्षक,आई वडील,घरातील मोठी माणसे यांच्याकडून मार्गदर्शन घेऊन पुस्तके वाचली पाहिजेत.वाढदिवस दणक्यात साजरा करण्याऐवजी वाढदिवसाला छान छान पुस्तके वाटली पाहिजेत.दिवाळीला फटाके वाजवण्याऐवजी दिवाळी अंक विकत घेऊन वाचले पाहिजेत.गाव तेथे ग्रंथालय ही लोकचळवळ झाली पाहिजे.आपण स्वतः पुस्तक वाचले पाहिजे व इतरांनाही वाचण्यास प्रोत्साहित केले पाहिजे तरच वाचनसंस्कृती जपता येईल.

वाचनासाठी विद्यार्थ्यांना प्रेरित केले पाहिजे. त्यामुळे त्यांचा मध्ये वाचनाची आवड र्निमाण होईल.

रॉयल इंटरनेशनल स्कूल या शाळेमध्ये आमच्या शाळेच्या विश्र्वस्तच्या अनुरोधाने १ डिसेंबर ते १० डिसेंबर वाचन दिवस राबण्यात आला. त्याचा फायदा विद्यार्थींना झाला. प्रत्येक विद्यार्थी आपणहूण वाचनास प्रवृत्त होत होते.

त्यामुळे शेवटी असं म्हणावस वाटत “वाचाल तर वाचाल”.

Similar questions