Hindi, asked by atharvapr01832, 3 months ago

वाचनाचे वेड या धड्याचे थोडक्यात वर्णन करा.​

Answers

Answered by aastharajput3101
12

Answer:

आजच्या धावपळीच्या युगात आपल्या छंदासाठी वेळ देणं म्हणजे तारेवरची कसरतच आहे. पण इच्छा असेल तर आपल्या छंदासाठीही आपण वेळ देऊ शकतो. मूळातच लहानपणापासून मला वाचनाचं प्रचंड वेड आहे. आज काळाच्या ओघात व सांसारिक तसंच कामाच्या जबाबदारीने वाचनाचा व्यासंग जपणं थोडं कठीण होत चाललंय. त्यात व्हॉट्सअॅप, फेसबुक आणि तत्सम सोशल मीडियावर अधिक वेळ खर्ची होतो. यातून वाचनाची आवड असूनही सवड मिळेनाशी झाली होती. यासाठीच तयार केला स्वतःचाच वाचन कट्टा.

पूर्वी हातात घेतलेलं पुस्तक वाचून संपल्यशिवाय हातावेगळं करायचंच नाही अशी सवय होती. या वाचन कट्ट्यास ही सवय कामी आली. घरातीलच हॉलमधील कोपरा माझ्या वाचन कट्ट्यासाठी कामी आला. वाचनाची आवड असल्याने जिथं कुठे जातो तिथं पहिल्यांदा नवनवीन पुस्तकं खरेदी करण्याची हौस भागवतो. त्यामुळे अनेकविध प्रकारची पुस्तके घरात उपलब्ध आहेत. त्यातीलच निवडक पुस्तकं महिनाभरासाठी वाचन कट्ट्यावर काढली जातात. महिनाभरात नोकरीच्या निमित्ताने दररोजच्या प्रवासात आणि सुट्टीच्या दिवशी त्या पुस्तकांचं वाचन करण्याची सवय स्वतःला लावली. साधारणपणे दररोज अडीच-तीन तास प्रवासात जातात. त्या वेळेचा सदुपयोग वाचनासाठी करून माझं वाचन वेड मी जपत आलो आहे. महिनाभरात साधारणपणे ८ ते १० पुस्तकं या वाचन कट्ट्यावर काढून ठेवली जातात. त्यापैकी पाच ते सात पुस्तके महिनाभरात वाचली जातात. विशेष म्हणजे कुटुंबातील इतर व्यक्ती आणि माझी आठवीला असणारी मुलगीही ही पुस्तकं वाचते. माझ्या परिवारातील इतर सदस्यांनाही वाचनाची आवड निर्माण होतेय, ही खरोखरंच खूप चांगली बाब आहे. आजकाल पीडीएफ स्वरूपातही अनेक वाचनीय पुस्तकं नेटवर उपलब्ध आहेत ती टॅबवर घेऊनही मिळेल त्या वेळेत वाचनाचा छंद मी जोपासत आहे.

Similar questions