India Languages, asked by kishor9367, 1 year ago

वाचन ही संकल्पना स्पष्ट करा​

Answers

Answered by Hansika4871
6

सध्याच्या काळात शिक्षणाला खूप महत्त्व दिले जाते. वाचाल तर वाचाल ही म्हण तुम्ही ऐकली असेलच. जो माणूस खूप शिकतो, वाचतो, बुद्धिमान असतो त्याला उच्च स्थान प्राप्त होते. वाचन ही संकल्पना म्हणजेच वाचण्याची आवड ही प्रत्येक माणसांत असली पाहिजे.

आपल्या आजूबाजूला वेगवेगळ्या प्रकारची, वेगवेगळ्या कथेची पुस्तकं सहज मिळतात. पुस्तके वाचली की आपल्याला शब्दांचा अर्थ व त्याच्या वापर कसा करायचा हे समजते. तसेच आपले शब्द भांडार वाढते आणि ते आपल्याला खूप कामी येते. माणसाला वाचायची आवड असली तर त्याचा वेळ सहज निघून जातो. वाचन हा सर्वात मोठा छंद आहे आणि वाचनाची आवड सगळ्यांनी जोपासावी हीच सदिच्छा.

Similar questions