वाढ पूर्ण झाल्यावर फुलपाखरू _____ अवस्थेत जातो
Answers
फुलपाखरू हा एक आकर्षक रंगांचा पंख असलेला एक कीटक आहे.कीटकांना डोके,पोट आणि छाती हे अवयव असतात. फुलपाखराला या जोडीने पंख आणि मिशा असतात. फुलपाखरे मिशानी वास घेतात तर पायाने चव ओळखतात.
फुलपाखरांचे जीवनचक्र हे फारच सौंदर्यपूर्ण आणि चित्तवेधक असते. मुळातच रंगीबेरंगी फुलपाखरे, त्यांच्या जीवनातल्या विविध अवस्था आणि स्थित्यंतराचा प्रवास अभ्यासणे हे तसे अभ्यासपूर्ण व चित्त वेधून घेणारे आहे. आपण आपल्या रोजच्या जीवनात तसेच आपल्या घराच्या आजूबाजूच्या परिसरात, बागेत, माळरानावर, जंगलात, नॅशनल पार्कमध्ये फिरत असताना रंगीबेरंगी फुलपाखरे पाहायला मिळतात आणि आपल्या मनात कुतूहल जागे होऊन आपल्याला प्रश्न पडतो की, फुलपाखरांचा सुरवंट ते एक सौंदर्याने नटलेले फुलपाखरू हा प्रवास नेमका कसा होत असेल? मग आपण त्याची माहिती मिळवायला सुरवात केल्यावर आपल्या समोर अत्यंत मनोरंजक अशी माहिती येते.