विहिरीचे मनोगत write essye
Answers
⠀⠀⠀⠀⠀ विहिरीचे मनोगत
एकदा मी गावी गेले होते. संध्याकाळी मी विहिरीच्या काठावर जाऊन बसले. मी विहिरीकडे पाहिले. विहीर खूपच खराब झाली होती. काठावरचे चिरे निखळले होते. विहिरीत खूप कचरा पडला होता. ते पाहून मला दुःख झाले. तेव्हा विहीरच माझ्याशी बोलू लागली.
विहीर मला सांगू लागली- “पाहिलेस मुली? माझी किती वाईट अवस्था आहे! कोणीही माझी नीट बांधणी करत नाहीत. पाण्यातला कचरा काढत नाहीत. माझ्या काठावरच भांडी घासतात. येथेच कपडे धुतात. येथेच आंघोळ करतात. ते सगळे घाण पाणी माझ्या स्वच्छ पाण्यातच येते. माझ्या तळाला खूप गाळ साचला आहे. तो कोणी काढत नाहीत. त्यामुळे माझ्याकडे येणाऱ्या झऱ्यांचे मार्ग बंद होतात. या सगळ्यामुळे माझे पाणी दूषित झाले आहे.
"तुम्हा मानवांनी सगळीकडची झाडे तोडून टाकली. त्यामुळे पाऊस कमी पडतो. झाडे नाहीत, म्हणून जमिनीखाली पाणी राहत नाही. त्यामुळे विहिरी, तलाव, नदया यांमध्ये पाणी कमी येते. तुम्ही पर्यावरण सांभाळा. नाहीतर तुम्हांला पाणीच मिळणार नाही.” एवढे बोलून विहीर गप्प झाली.