४) व्हर्चुअल क्लासरुमचे स्वरूप सविस्तर लिहा.BA.BCom
Answers
Explanation:
व्हर्च्यूअल क्लासरूम
तेथे कॅमेरे, मायक्रोफोन, डिसप्ले स्क्रीनची सोय केलेली असते. तर जेथे विद्यार्थी येणार तेथे (वर्गात) एक मोठा पडदा (डिस्प्ले स्क्रीन) व मायक्रोफोनची सोय केलेली असते. असे अनेक वर्ग वेगवेगळ्या ठिकाणी असतात. हे सर्व वर्ग व तज्ज्ञ जेथून मार्गदर्शन करणार तो स्टुडिओ व्हिसेंटद्वारा जोडलेले असतात. वर्गातील पडद्यावर मार्गदर्शन करणारे तज्ज्ञ दिसतात व त्यांचे विवेचन ऐकता येते. वर्गातील विद्यार्थ्यांना तज्ज्ञांच्या परवानगीने प्रश्न / शंका विचारता येतात व त्यांचे निरसन तज्ज्ञ करू शकतात. एका ठिकाणच्या विद्यार्थ्याने उपस्थित केलेला प्रश्न व त्यास तज्ज्ञाने दिलेले उत्तर सर्वं वर्गांमधील विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचते. वर्गांमध्येही कॅमेरे लावल्यास अशा मार्गदर्शक सत्रांमध्ये जास्त परिणामकारकता येते. यामुळे तज्ज्ञांनाही वर्गामधील विद्यार्थ्यांना विषय कितपत समजतो आहे हे समजते. तसेच प्रश्न विचारणारा विद्यार्थी इतर विद्यार्थ्यांना दिसू शकतो. व्हर्म्युअल क्लासरूमचा वापर करायचा तर त्यासाठी सुरुवातीस येणारा खर्च प्रचंड आहे. मात्र हा खर्च एकदा केला की त्यामुळे बरेच फायदे होणार आहेत. आज सर्वच ठिकाणी सर्व विषयांचे तज्ज्ञ उपलब्ध नसतात. केवळ चांगल्या शिक्षकांचे मार्गदर्शन मिळू न शकल्याने मागे पडणारे विद्यार्थी व्हर्म्युअल क्लासरूमचा वापर केल्याने पुढे चांगल्या प्रकारे प्रगती करू शकतील. तसेच कमी शिक्षक अनेक विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करू शकतील. त्यामुळे सुरुवातीच्या खर्चानंतर होणारा खर्च अतिशय कमी असेल.