Hindi, asked by ayyazbelgavker, 1 year ago

वाहतुक नियंत्रक पोलिसाची मुलाखत प्रश्नावली​

Answers

Answered by rajraaz85
40

Answer:

वाहतूक नियंत्रण पोलिसाची मुलाखत प्रश्नावली

वाहतूक नियंत्रण पोलिसाचे स्वागत करून त्यांनी केलेल्या कामाबद्दल त्यांचे आभार व्यक्त करणे.

१. सगळ्यात अगोदर तुमचे नाव सांगा व तुम्ही कुठल्या पोलीस ठाण्यात कार्यरत आहात त्याची माहिती द्या?

२. तुम्ही या क्षेत्रात कसे आलात व या क्षेत्रात येण्यासाठी कशी प्रेरणा मिळाली?

३. वाहतूक नियंत्रण पोलीस बनण्यासाठी तुम्ही कुठले प्रशिक्षण घेतले होते का?

४. वाहतूक नियंत्रण पोलिसाला दिवसभर बाहेर राहावे लागते. या सर्व दगदगीत तुम्ही स्वतःच्या आरोग्याला कसे जपतात?

५. वाहतूक नियंत्रण पोलीस म्हणून लोकांनी सर्व नियम पाळावेत यासाठी जनजागृती कशी करतात?

६. तुम्ही सतत बाहेर असल्यामुळे व तुमच्या कामाचा वेळ जास्त असल्यामुळे याचा तुमच्या कुटुंबावर काय परिणाम होतो?

७. सर्वसामान्यांप्रमाणे तुम्हाला कुठलाही सण साजरा करता येत नाही याबद्दल कधी खेद वाटतो का?

८. लोक वाहतुकीचे नियम पाळत नाही याचे काय कारण असावे?

९. लोक नेहमी वाहतूक नियंत्रण पोलिसाची तक्रार करत असतात याबद्दल तुम्हाला काय वाटते?

१०. लोकांच्या सुरक्षेसाठी तुम्ही त्यांना काय आवाहन करणार?

Answered by 932211925
4

Answer:

 वाहतूक पोलीसाची मुलाखत प्रश्नावली

Explanation:

Similar questions