History, asked by jayshrisonavane, 11 months ago


विज्ञान आणि इतर सर्वच ज्ञान शाखांची--------
जननी मानली जाते.​

Answers

Answered by anasmirza90990099
9

विज्ञान : विज्ञान म्हणजे नेमके काय अथवा विज्ञानाची व्याख्या देता येईल का? असा प्रश्न मनात येतो. या प्रश्नाचे उत्तर कदाचित नाही असेल. विज्ञानाचा विषय कोणताही असला, तरी त्यात जगाविषयी किंवा निसर्गाच्या कार्याविषयी शोध घेतला जातो आणि निसर्गाविषयी वा जगाविषयी विचार करण्याची माणसाची ही चित्तवृत्ती (मनःस्थिती) एकसारखी बदलत राहते. शिवाय वैज्ञानिकही सतत वैज्ञानिक मनःस्थितीत असत नाही.

विज्ञान म्हणजे सुसंघटित विशेष ज्ञान होय अथवा नैसर्गिक वस्तू, जीव, घटना, इत्यादींविषयाची माहिती व ज्ञान म्हणजे विज्ञान अशा विज्ञानाच्या व्याख्या केल्या जातात. अधिक व्यापक व्याख्या पुढील प्रमाणे केली जाते : विज्ञान ही ज्ञानाची एक अतिव्यापक शाखा असून तिच्यात वास्तव गोष्टींचे किंवा वस्तुस्थितींचे निरीक्षण करून त्यांचे वर्गीकरण करतात आणि बहुधा त्यांच्यामधील परस्परसंबंधीविषयीचे परिमाणात्मक नियम सूत्रबद्ध करून त्यांची खातरजमा करून घेतात. नैसर्गिक आविष्कार समजून घेण्यासाठी विज्ञानात गणितीय युक्तिवाद (तर्कशास्त्र) किंवा कार्यकारणभाव आणि माहितीचे विश्लेषण यांचा उपयोग करतात. म्हणजे खात्री करून घेतलेल्या माहितीची विज्ञानात नियमबद्ध रीतीने सुव्यवस्थित मांडणी केली जाते. अशा माहितीला व्यापक स्वरूप देण्याच्या पद्धती आणि तिचा खरेपणा पडताळून पाहाण्यासाठीचे निकष यांचाही अंतर्भाव विज्ञानात होतो

Similar questions