World Languages, asked by mayurpatil982231, 6 months ago

विज्ञानाची
आराधना म्हणजेच ईश्वराची आराधना
बातमी तयार करा.​

Answers

Answered by vimalkumarvishwakarm
1

Answer:

आनंददायी चमत्काराचा।।

अशी विज्ञानाची महती आहे. पण आपणास पावलोपावली पडणारा प्रश्न म्हणजे ‘'विज्ञान शाप की वरदान?’ विज्ञानाने पुरविलेल्या अनेक सुविधा आपण उपभोगतो आणि त्याचवेळी वैज्ञानिक शोधातून ओढवलेले जीवघेणे अपघातही पाहतो. या सर्व प्रसंगांतूनच हा प्रश्न निर्माण झाला आहे.

आपल्या सर्व गरजा पुरवणारी, विविध रहस्य उलगडणारी चमत्कारी मानली जाणारी शक्ती म्हणजे विज्ञान. हे विज्ञान म्हणजे मानवाला लाभलेला एक परीस आहे. आपल्या भोवतालचा अज्ञानाचा अंधार विज्ञानाने जादूच्या कांडीप्रमाणे दूर केला. या विज्ञानाने मानवी जीवनात अनेक आमूलाग्र बदल घडवून आणले. चाकाच्या शोधानंतर मानवी जीवनाला गती मिळाली. मानवाच्या प्रत्येक गरजा पुरवणारी यंत्रे विज्ञानाने दिली. मानवाच्या जीवनाला स्थैर्य लाभले. अनेक कठीण कामे सुलभ झाली. वेळ लांबवणारी कामे क्षणार्धात होऊन वेळेची बचत होऊ लागली.

अत्याधुनिक यंत्रांच्या सहाय्याने ज्ञानाच्या शाखा रूंदावल्या. संगणकीकरणाच्या या एकविसाव्या शतकात दळणवळण व माहिती तंत्रज्ञान अफाट विस्तारले आहे. एका क्लिकवर आपल्याला जगभराची माहिती मिळते. सातासमुद्रापलिकडे असणारे जग जवळ आले आहे. मोबाइल तर संदेदशवहनाची खाणच आहे. मोट्या प्रमाणावर संदेशवहनामुळे कल्पनांची देवाणघेवाण होऊन जीवनाच्या अनेक क्षेत्रात प्रगती झाली आहे. आरोग्य, शिक्षण, औद्योगिकीकरण अशा विविध क्षेत्रात विलक्षण क्रांती घडून आली आहे. अंधश्रद्धेपासून अलिप्त असा नवा समाज निर्माण झाला. मानवाने भूमीप्रमाणे सागरावर आणि अंतरिक्षावरही स्वामित्त्व मिळवले आहे.

मात्र, विज्ञान फक्त आपल्या गरजा पूर्ण करू शकते, हाव नाही. विज्ञानाने शोधलेल्या यंत्रांनी कष्टाचे महत्त्व नाहीसे झाले व माणूस आळशी बनला. स्वयंपाकापासून खेळापर्यंत उद्योगापासून प्रगतीपर्यंत सर्व गोष्टी जलद व सुलभ रीतीने करण्याचे तंत्र विज्ञानाने दिले. पण आपण मात्र शरीरासाठी आवश्यक व्यायाम, अन्नाचा ताळमेळ निसर्गाचे सान्निध्य सर्व काही हरवून बसलो. जलद जीवनशैलीत आपण आपली माणुसकीच विसरलो.

निसर्गाचा तर मानवाने मोठ्या प्रमाणावर छळ केला. निसर्गाने दिलेल्या अमृतरूपी औद्योगिक क्रांतीचे रूपांतर मानवाने प्रदूषणरूपी महाभयंकर राक्षसात केले. वनांची व वन्यजीवांची कत्तल करून निसर्गाचा समतोल बिघडवून टाकला. आपल्या संरक्षणासाठी मिळालेल्या अणुशक्तीचा वापर मानवाने क्रूरपणे महायुद्धात केला. लहान लहान कारणांसाठी आपण नैसर्गिक साधनसंपत्ती व ऊर्जेचा मोठ्या प्रमाणावर अपव्यय करतो. ज्या सोनोग्राफीच्या क्रांतिकारी शोधानंतर मोठ्या प्रमाणावर रोगांवर प्रतिबंध मिळविता आला, त्या तंत्राचा वापर स्त्रीभूणहत्येसारख्या अमानुष कृत्यांमध्ये केला जात आहे.

Similar questions