Hindi, asked by tusharphotomiraj, 11 months ago

विज्ञानाचे महत्त्व निबंध​

Answers

Answered by anujagandhi2
2

पृथ्वीतलावरील मानवाला मिळालेले अनोखे वरदान म्हणजे विज्ञान। विज्ञानाने केलेले चमत्कार विलक्षण आणि अद्भुत आहे. म्हणूनच आजच्या या युगाला “ विज्ञान युग “ असे म्हटले आहे. जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रात क्रांती घडवून आणण्याची शक्ती या विज्ञानात आहे.

या विज्ञानामुळे आपली जीवनशैली अधिक आरामदायी व सुखकर झाली आहे. दैनंदिन जीवनात असा एकही घटक नाही ज्याला विज्ञानाने स्पर्श केला नहीं. सकाळी ऊठल्यावर आपल्याला गीझर किंवा शॉवर च गरम पाणी आंघोळीला लागत, संध्याकाली ऑफिसातून बाबा दमून-भागून घरी आल्यावर लागणारा पंखा किंवा ए. सी. रात्रीचा मिट्ट काळोख नष्ट करण्यासाठी लागणारे दिवे.

आशाप्रकारे विज्ञानामुळे विजेचा सोध आजच्या उगातील कल्पवृक्ष ठरला आहे। विज्ञान व जीवन या दोन गोष्टी एकमेकांच्या हातात हात घालून चालणारे मित्र आहेत.

विज्ञानाचा आणखी एक चमत्कार म्हणजे संगणक जगाला जवळ आणण्याचे महान कार्य आज संगनकाने केले आहे. आज जगाच्या पाठीवर कोठेही असलेली माणसे एकमेकांना भेटू लागली आहेत. बाजारात न जाता आता जगभरात कुठेही घरबसल्या खरेदी करू लागली आहेत.

बँक, विजेचे, दुरध्वनीचे बिले असो की रेल्वे विमान यांची तिकिटे काढण्याचे काम असो संगणक हा सर्वसमान्यांसाठी सेवक ठरला आहे. कोरोना कालांत विद्यार्थ्याचे शिक्षण नोकरदार्यांचे वर्क फ्रॉम होम. अबालवृद्धांचे मनोरंजन या साठी तो देव दूतच ठरला आहे.

ज्ञानाचा प्रचार प्रसारासाठी अत्याधुनिक छापाई यंत्र आहेत. छपाई यंत्रातून लाखों प्रती काही तासतच छापून वितरणासाठी तयार होतात. टेलिफोन, टेलिफॅक्स भ्रमणध्वनी यांच्या माध्यमातून जगातील कोणत्याही देशात संदेश पाठवू शकतो.

विज्ञानाने भूमिवर चमत्कार केला आहे. ओसाड वाळवंटी प्रदेशात नंदनवन फुलवले आहेत. कृषि क्षेत्रात नव-नवीन प्रयोग सुरू आहेत। नवीन यंत्राची निर्मिती सुरू झाली आहेत. ट्रॅक्टर, नागरणी यंत्रे, कटा ईचे यंत्र यामुळे वेळेची बचत होऊन उत्पादन क्षमता वाढली आहे. या मुळेच आजच्या सुशिक्षित तरुणांनी या करोना कालात चला खेड्याकडे हा मंत्र स्वीकारला पाहिजे. विज्ञानाचे भूमिवर प्रमाणेच सागरावर सुद्धा विजय मिलवला आहे. अथांग सागराचा तल हे एक गूढ होते.

त्या तलाला आज पानबुडयांनी पिंजून काढलेले आहे. आकाशाच्या पोकलीट मानवाने कृत्रिम उपग्रह सोडून अमर्याद अवकाशावर सत्ता गाजवली आहे. चंद्रावर पाऊल ठेऊन गप्प न बसता आज मानव अन्य ग्रहांवर गमनाचा प्रयत्न करत आहे.

मानव व्यवहारी व यांत्रिक बनला आहे। या विज्ञानरूपी अश्वाची दौड ही जगाचे कल्याण करण्यासाठी करायचे की विनाशासाठी हे केवल मानवाच्या हाती आहे.

Similar questions